महिलेच्या पोटातून तब्बल 30 किलोचा ट्यूमर काढला

| Updated on: Jul 05, 2019 | 4:27 PM

मुंबई : शासकीय रुग्णालयाला लोक सध्या खाजगी रुग्णालयांपेक्षा कमी लेखतात. मात्र मुंबईतील जेजे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी यशस्वी कामगिरी केली आहे. उत्तरप्रदेशच्या मुरादाबाद येथून आलेल्या एका 45 वर्षीय महिलेच्या पोटातून 30 किलोचा ट्यूमर काढण्यात जे.जे. रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञांच्या टीमला यश आलं आहे. गेल्या 6 महिन्यांपासून या महिलेला श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. मुरादाबादमधल्या स्थानिक डॉक्टरांकडून उपचार घेऊनही तिला […]

महिलेच्या पोटातून तब्बल 30 किलोचा ट्यूमर काढला
Follow us on

मुंबई : शासकीय रुग्णालयाला लोक सध्या खाजगी रुग्णालयांपेक्षा कमी लेखतात. मात्र मुंबईतील जेजे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी यशस्वी कामगिरी केली आहे. उत्तरप्रदेशच्या मुरादाबाद येथून आलेल्या एका 45 वर्षीय महिलेच्या पोटातून 30 किलोचा ट्यूमर काढण्यात जे.जे. रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञांच्या टीमला यश आलं आहे.

गेल्या 6 महिन्यांपासून या महिलेला श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. मुरादाबादमधल्या स्थानिक डॉक्टरांकडून उपचार घेऊनही तिला बरं वाटलं नाही. त्यानंतर ती 24 जानेवरी 2019 ला मुंबईतील जे.जे. रुग्णालयात दाखल झाली. हृदयाच्या झडपा, यकृत, पित्ताशय आणि गर्भाशय या शरीरातील सर्व अवयवांमध्ये हा ट्यूमर पसरला होता. 3 किलोची 10 बाळ याप्रमाणे 30 किलोचा हा ट्यूमर होता.

4 फेब्रुवारीला तब्बल पाच तास ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली गेली. या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर ही महिला साध्य नॉर्मल आहे. त्याला नवजीवन मिळालं आहे. ही शस्त्रक्रिया अत्यंत धोकादायक होती. कारण महिलेच्या पोटात ट्यूमर मोठा झाला होता. मात्र तरीही रुग्णाच्या कुटुंबीयांनी जीव जाण्याचा धोका असूनही ऑपरेशन करण्यासाठी सहमती दर्शविली आणि जेजे रुग्णालयातील डॉकटरांच्या टीमने अत्यंत गुंतागुंतीची ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली.

सध्या पीडित महिला जकिया बानो कुरेशी ही जेजेमध्ये भरती असून तिची प्रकृती ठिक आहे. महिलेला या शस्त्रक्रियेनंतर जीवनदान मिळालं आहे. त्याचा आनंद तिला तर आहेच, मात्र जेजे रुग्णालयातील डॉक्टर टीमही समाधानी आहे. कारण, त्यांच्या प्रयत्नाला यश आलं आहे.