ये रिश्ता क्या कहलाता है?, अदानी यांच्यासोबत कोण कोण?; भाजप नेत्याचा राहुल गांधी यांना करारा जवाब

| Updated on: Feb 08, 2023 | 8:23 AM

केशव उपाध्ये यांनी या ट्विटमध्ये तीन फोटो पोस्ट केले आहेत. त्यापैकी एका फोटो अदानी हे काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्यासोबत चर्चा करताना दिसत आहेत.

ये रिश्ता क्या कहलाता है?, अदानी यांच्यासोबत कोण कोण?; भाजप नेत्याचा राहुल गांधी यांना करारा जवाब
rahul gandhi
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: अदानी समूहाच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप सरकारला संसदेत घेरलं. खासकरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. अदानी हे मोदींचे मित्र आहेत. मोदी त्यांच्यासोबत विमानाने प्रवास करत होते, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. त्यामुळे भाजपची संसदेत चांगलीच कोंडी झाली आहे. एकीकडे भाजपची संसदेत कोंडी होत असतानाच महाराष्ट्रातील भाजपचा एक नेता भाजपच्या मदतीला धावून आला आहे. या नेत्याने विरोधकांचे अदानी यांच्यासोबतचे फोटो ट्विट करून राहुल गांधी यांना एक प्रकारचा करारा जवाबच दिला आहे.

हे सुद्धा वाचा

भाजपचे महाराष्ट्र प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी तीन फोटो पोस्ट केले आहेत. त्यावर त्यांनी खोचक कमेंट केली आहे. मी राहुल गांधी यांना विनंती करेल की, ये रिश्ता क्या कहलाता है? याचं देखील उत्तर द्या…, असं ट्विट केशव उपाध्ये यांनी केलं आहे.

फोटोत काय?

केशव उपाध्ये यांनी या ट्विटमध्ये तीन फोटो पोस्ट केले आहेत. त्यापैकी एका फोटो अदानी हे काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्यासोबत चर्चा करताना दिसत आहेत. दुसऱ्या फोटोत ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यासोबत अदानी दिसत आहेत.

तर तिसऱ्या फोटोत अदानी हे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यासोबत दिसत आहेत. रोहित पवार आणि अदानी हे एकाच गाडीत बसलेले आहेत. रोहित पवार या कारचे सारथ्य करताना दिसत आहेत. उपाध्ये यांनी अवघे तीन फोटो शेअर करून राहुल गांधी यांना ये रिश्ता क्या कहलाता है? असा सवाल केला आहे.

 

राहुल गांधी यांची टीका काय?

राहुल गांधी यांनी काल संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रश्नांची बरसात करत भाजपला घेरलं. गौतम अदानीसोबत पंतप्रधान कितीवेळा परदेश दौऱ्यावर गेले? अदानीला कंत्राट दिल्यानंतर किती देशांचे दौरे केले? गेल्या 20 वर्षात अदानी समूहाकडून भाजपला किती देणगी मिळाली?, असे सवाल राहुल गांधी यांनी केले.

पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी अदानी यांच्या प्लेनमधून उड्डाण करत होते. आता अदानी हे मोदी यांच्या प्लेनमधून उड्डाण करत आहेत, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

किती देशात कंत्राट मिळाले?

पंतप्रधानांचे परदेश दौरे झाले. या दौऱ्यात अदानी कितीवेळा मोदींसोबत होते. तुमच्या दौऱ्यानंतर किती देशात अदानी यांना कंत्राट मिळाले? असा सवालही राहुल गांधी यांनी उपस्थित केला.