दिवाळीपूर्वीचं फटाका फोडतोय, अजित पवार आणि पवारांच्या जावयांच्या कंपन्यात 1050 कोटी आले, किरीट सोमय्यांचा आरोप

| Updated on: Nov 01, 2021 | 12:25 PM

अजित पवारांच्या खात्यात शेकडो कोटी रुपये आले ते पैसे अजित पवारांनी जावायाच्या, बायकोच्या खात्यात बहिणीच्या खात्यात आणि आईच्या खात्यात वर्ग केले. अजित पवारांनी चोरीचा माल पूर्ण परिवाराच्या खात्यात पैसे वर्ग केलेत, असा आरोप सोमय्यांनी केला.

दिवाळीपूर्वीचं फटाका फोडतोय, अजित पवार आणि पवारांच्या जावयांच्या कंपन्यात 1050 कोटी आले, किरीट सोमय्यांचा आरोप
किरीट सोमय्या, भाजप नेते
Follow us on

मुंबई: भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा अजित पवार आणि कुटुंबीयांवर आरोप केले आहोत. अजित पवारांच्या कंपनीत अनेक बिल्डरांकडून पैसे आले ते परत दिले गेले नाहीत. ठाकरे पवारांचं हेच वैशिष्ठ्य आहे, असं किरीट सोमय्या म्हणाले. संजय राऊतांच्या खात्यात लाखो कोटी रुपये आले ते परत दिलेच नाहीत. ईडीची नोटीस आल्यावर संजय राऊतांनी पैसे परत दिले. अजित पवारांच्या खात्यात शेकडो कोटी रुपये आले ते पैसे अजित पवारांनी जावायाच्या, बायकोच्या खात्यात बहिणीच्या खात्यात आणि आईच्या खात्यात वर्ग केले. अजित पवारांनी चोरीचा माल पूर्ण परिवाराच्या खात्यात पैसे वर्ग केलेत, असा आरोप सोमय्यांनी केला.

ईडीच्या 19 दिवस धाडी

इन्कम टॅक्सनंतर ईडीच्या धाडी पडल्या. 19 दिवस या धाडी सुरु आहेत. एक हजार कोटीपेक्षा अधिक संपत्ती समोर आली आहे. शेल कंपन्यांमधून पैसे आले आहेत. शरद पवारांना असं वाटत का पाच पंधरा लेअर तयार केल्यामुळं ब्लॅक मनी समोर येणार आला नाही. इन्कम टॅक्स आणि ईडीच्या धाडी बाहेर पडू नये म्हणून नवाब मलिकांना पुढं करण्यात आलं आहे.

नवाब मलिकांनी पेड पब्लिसिटी सुरु केलीय

मलिक साहेब, समीर वानखेडे पहिल्या लग्नापूर्वी पोलिसात नोकरी लागले होते. नवाब मलिक तुम्ही ते यूपीएससीतून अधिकारी झाले तेव्हा का गप्प बसला होता. नवाब मलिकांची पेड पब्लिसिटी सुरु केलीय. नवाब मलिक आता देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीबद्दल बोलत आहेत. अजित पवार आणि पवार कुटुंबाच्या जावयांच्या कंपन्यात एक हजार पन्नास कोटी रुपये कोठून आले याचं उत्तर द्यावं. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं, असं आव्हान किरीट सोमय्या यांनी दिलं आहे.

गेल्या चार महिन्यापासून मी आणि आमच्या टीमकडून अभ्यास सुरु होता. आयटी आणि ईडीच्या धाडीतून ते स्पष्ट झालंय. जरंडेश्वरच्या शेतकऱ्यांनी पुरावे दिले आहेत त्यातून ते स्पष्ट झालंय. नवाब मलिकांना दाऊद नाव हे खूप ओळखीचं आहे. उद्धव ठाकरेंचे वडील बाळासाहेब ठाकरे यांची 1992 ते 1995 भाषणं ऐकली असती तर नवाब मलिकांना दाऊद आणि शरद पवारांचा काय संबंध आहे हे कळलं असंत, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

माझ्यावर दहा हजार कोटींचा दावा केला तरी मी माझ्या आरोपावर ठाम आहे. दोन बिल्डरांकडे 180 कोटी रुपयांची संपत्ती आढळली. बिल्डरांकडून आलेले पैसे अजित पवारांच्या नातेवाईकांच्या खात्यात पैसे वर्ग केले गेले आणि पवारांचा साम्राज्य उभं राहिलं, असा आरोप किरीट सोमय्यांनी केला. समीर वानखेडे आणि अमृता फडणवीस इतकं गलिच्छ राजकारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार हेच करु शकतात, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. नवाब मलिकांच्या ट्विटमुळं मला आजचं पहिला फटाका फोडावा लागला, असं सोमय्या म्हणाले.

इतर बातम्या:

फडणवीस म्हणाले, दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार, मलिक म्हणतात, है तैयार हम !

मलिक म्हणाले, गुंडेचे फडणवीसांशी संबंध, आता देवेंद्र म्हणतात, त्यांचे तर उद्धव ठाकरेंशीही संबंध

Kirit Somaiya accused Ajit Pawar said one thousand crore black money came in companies of Pawar family related persons