मलिक म्हणाले, गुंडेचे फडणवीसांशी संबंध, आता देवेंद्र म्हणतात, त्यांचे तर उद्धव ठाकरेंशीही संबंध

Devendra Fadnavis | नीरज गुंडे याच्याशी माझे संबंध आहेत, ते नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. पण नीरज गुंडे हे माझ्यापेक्षा जास्तवेळा उद्धव ठाकरे यांना भेटले आहेत. मी नीरज गुंडे यांच्या घरी जायचो. पण यापूर्वी उद्धव ठाकरेही माझ्यापेक्षा जास्तवेळा त्यांच्या घरी गेले आहेत.

मलिक म्हणाले, गुंडेचे फडणवीसांशी संबंध, आता देवेंद्र म्हणतात, त्यांचे तर उद्धव ठाकरेंशीही संबंध
देवेंद्र फडणवीस आणि नवाब मलिक
Follow us
| Updated on: Nov 01, 2021 | 11:10 AM

मुंबई: मला उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी कोणाच्याही मांडवलीची गरज लागत नाही. उद्धव ठाकरे आणि मी मांडवली नव्हे तर चर्चा करायचो. नवाब मलिक यांच्यासारखे लोक मांडवली करतात, असे वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी सोमवारी पत्रकारपरिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर प्रत्युत्तर दिले.

शिवसेना-भाजप सरकारच्या काळात नीरज गुंडे हा देवेंद्र फडणवीस यांचा दूत म्हणून काम करत होता. पोलिसांच्या बदल्यांपासून ते मंत्रालयातील कामे मार्गी लावण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती. एवढेच नव्हे तर शिवसेना आणि भाजपमध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर नीरज गुंडे मातोश्रीवर निरोप घेऊन जायचा, असा दावा नवाब मलिक यांनी केला होता. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना कोणाच्याही मांडवलीची गरज पडत नाही. आम्ही मांडवली नव्हे तर चर्चा करतो, असे देवेंद्र यांनी स्पष्ट केले.

‘नीरज गुंडे माझ्यापेक्षा उद्धव ठाकरेंच्या अधिक संपर्कात’

नीरज गुंडे याच्याशी माझे संबंध आहेत, ते नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. पण नीरज गुंडे हे माझ्यापेक्षा जास्तवेळा उद्धव ठाकरे यांना भेटले आहेत. मी नीरज गुंडे यांच्या घरी जायचो. पण यापूर्वी उद्धव ठाकरेही माझ्यापेक्षा जास्तवेळा त्यांच्या घरी गेले आहेत. एवढेच नव्हे तर नीरज गुंडे माझ्यापेक्षा जास्तवेळा मातोश्रीवर गेले असतील, याकडे देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

‘नवाब मलिकांनी दिवाळीपूर्वी लवंगी फटाका फोडलाय, मी दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार’

या पत्रकारपरिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांनी केलेल्या सर्व आरोपांना प्रत्युत्तर दिले. नवाब मलिक आपण काहीतरी मोठा गौप्यस्फोट केल्याचा आव आणत आहेत. मात्र, त्यांनी दिवाळीपूर्वी लवंगी फटाका फोडलाय. पण मी दिवाळी झाल्यानंतर बॉम्ब फोडणार. नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी असणारे संबंध मी पुराव्यानिशी समोर आणेन. देवेंद्र फडणवीस हा पुराव्याशिवाय आरोप करत नाही. आजपर्यंत एकदा केलेला आरोप मला कधीही मागे घेण्याची वेळ आलेली नाही. त्यामुळे नवाब मलिकांनी सुरु केलेल्या या खेळाचा शेवट आता मी करणार. मी काचेच्या घरात राहत नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध, शरद पवारांनाच पुरावे देणार, दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा

Nawab Malik | ड्रग पेडलर जयदीप राणाशी फडणवीसांचे घनिष्ठ संबंध, नवाब मलिकांनी बॉम्ब फोडला

नवाब मलिकांच्या सनसनाटी आरोपांनंतर अमृता फडणवीसांचं ट्विट, म्हणाल्या…

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.