AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nawab Malik | ड्रग पेडलर जयदीप राणाशी फडणवीसांचे घनिष्ठ संबंध, नवाब मलिकांनी बॉम्ब फोडला

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत अनेक गंभीर दावे केले. यामध्ये आज त्यांनी भाजपचे विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत म्हटले की त्यांचे ड्रग्ज पेडलर जयदीप राणा यांच्यासी घनिष्ठ संबंध आहेत. तसेच, देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरुन महाराष्ट्रात ड्रग्जचा खेळ सुरु आहे, असाही आरोप त्यांनी केला.

Nawab Malik | ड्रग पेडलर जयदीप राणाशी फडणवीसांचे घनिष्ठ संबंध, नवाब मलिकांनी बॉम्ब फोडला
Devendra Fadnavis - Nawab Malik
| Edited By: | Updated on: Nov 01, 2021 | 10:26 AM
Share

मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत अनेक गंभीर दावे केले. यामध्ये आज त्यांनी भाजपचे विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत म्हटले की त्यांचे ड्रग्ज पेडलर जयदीप राणा यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत. तसेच, देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरुन महाराष्ट्रात ड्रग्जचा खेळ सुरु आहे, असाही आरोप त्यांनी केला.

नवाब मलिक नेमकं काय म्हणाले?

जयदीप राणाचा मी फोटो आज ट्विट केला. जयदीप राणा हा सध्या जेलमध्ये बंद आहे. जयदीप राणा 2020 दिल्लीच्या केसमध्ये सध्या जेलमध्ये बंद आहे. ड्रग्ज ट्रॅफिकिंगच्या प्रकरणात त्याला अटक झाली आहे. पण, त्यांचे संबंध महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्यासोबत आहेत.

महाराष्ट्रात जेव्हा ते मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक नदी स्वच्छता मोहीमेविषयी गाणं केलं होतं. त्यात सोनू निगम आणि फडणवीसांच्या पत्नी यांनी गाणं गायलं होतं. फडणवीसांनी, सुधीर मुनगंटीवारांनी अभिनय केला होता.

त्या गाण्याचे फायनान्स हेड जयदीप राणा होते. देवेंद्र फडणवीस आणि जयदीप राणाचे जवळचे संबंध आहेत, असा दावा नवाब मलिकांनी केला आहे. इतकंच नाही तर गणपतीच्या दर्शनासाठी फडणवीस आणि जयदीप राणा हे एकत्र दिसत असल्याचा फोटो आहे.

ड्रग्जचा खेळ हा देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावर सुरु आहे

फडणवीसांचा एक व्यक्ती नीरज गुंडे याच शहरात राहातो. ज्याला माजी सरकारच्या काळात मुख्यमंत्री निवास, कार्यालयात, सर्व अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाण्याची परवानगी होती. पोलिसांच्या बदल्याही तो ठरवायचा. देवेंद्र फडणवीस जेव्हाही नवी मुंबई, पुण्याकडे जायचे, सायंकाळी ते त्यांच्या घरी हजेरी लावायला जायचे. तिथूनच फडणवीसांचा सर्व मायाजाल चालायचा. सरकार बदलल्यानंतर राज्यात ज्या कुठल्या केंद्रीय संस्था आहेत त्यामध्ये हाच फडणवीसांचा वाझे सर्व कार्यालयात फिरताना दिसत आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

समीर दाऊद वानखेडे जो गेल्या 14 वर्षांपासून या शहरात वेगवेगळ्या विभागांमध्ये कामन करतोय त्यांच्याही बदलीमागे राज्याचे माजी मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांना यासाठीच आणलं गेलं होतं की त्यांनी पल्बिसीटी करुन निर्दोष लोकांना फसवावं. ड्रग्जचा खेळ मुंबई, गोव्यात सुरु राहावा. मोठ मोठे ड्रग्ज पॅडलर्स मग तो काशिफ खान असो त्याला सोडलं जातं. ऋषभ सचदेवा, आमिर फर्निचरवाला आणि प्रतिक गाभाला सोडलं जातं. राज्यात सर्व ड्रग्जचा खेळ हा देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावर सुरु आहे. ड्रग्जच्या खेळाचा मास्टर माईंड राज्याचे माजी मुख्यमंत्री तर नाही हा प्रश्न आमच्या डोक्यात येत आहे.

याआधी, नवाब मलिक यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा फोटो मलिक यांनी ट्वीट केला होता. या फोटोत मिसेस फडणवीस यांच्यासोबत दिसणारी व्यक्ती ही ड्रग पेडलर असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला होता. ‘या’ ड्रग्ज पेडलरचं भाजपसोबत कनेक्शन काय?’ असा सवाल राजकीय विश्लेषक निशांत वर्मा यांच्या ट्वीटचा हवाला देत नवाब मलिक यांनी विचारला होता. निशांत वर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन अमृता फडणवीस यांचा एक फोटो शेअर करुन भाजपचं ड्रग्ज नेक्सस असा उल्लेख केला आहे. याच फोटोचा आधार घेत मलिक यांनी ‘चला आज भाजप आणि ड्रग्ज पेडलर यांच्या नात्यावर चर्चा करुया’ असं ट्वीट केलं होतं

संबंधित बातम्या :

नवाब मलिकांनी शोधलेल्या वनस्पतीचं बियाणं शेतकऱ्यांना द्या, राधाकृष्ण विखे पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अरे, बाबा तुम्हाला कोणी अडवले? या धमक्या द्यायचं बंद करा, जे करायचं ते करा; चंद्रकांत पाटलांचं मलिक यांना आव्हान

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.