अरे, बाबा तुम्हाला कोणी अडवले? या धमक्या द्यायचं बंद करा, जे करायचं ते करा; चंद्रकांत पाटलांचं मलिक यांना आव्हान

अरे बाबा, तुम्हाला कोणी अडवले आहे? या धमक्या द्यायचं बंद करा. जे करायचं ते करा, असं आव्हानच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना दिलं आहे. (chandrakant patil attacks nawab malik over sameer wankhede)

अरे, बाबा तुम्हाला कोणी अडवले? या धमक्या द्यायचं बंद करा, जे करायचं ते करा; चंद्रकांत पाटलांचं मलिक यांना आव्हान
chandrakant patil

पालघर: अरे बाबा, तुम्हाला कोणी अडवले आहे? या धमक्या द्यायचं बंद करा. जे करायचं ते करा, असं आव्हानच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना दिलं आहे.

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड येथे भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी कोरोनामुळे निधन झालेल्या भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत करण्यात आली. भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार संजय केळकर, कुणबी सेना अध्यक्ष विश्वनाथ पाटील यांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला. पालघर जिल्ह्यातील 26 कुटुंबांना भाजपतर्फे धनादेश वाटप करण्यात आले. तसेच या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा भार भाजपकडून करण्याचे आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिले.

धमक्या देणं बंद करा

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यावर आरोप केला होता. चेंबूर येथील एक व्यक्ती फडवणीसांच्या अत्यंत जवळचा आहे. तो त्यांच्या काळात मंत्रालयात जात असे. ईडी आणि समीर वानखेडे संपर्कात असते. मी अधिवेशानत सर्व खूलासा करणार आहे. हा खुलासा केल्यानंतर भाजपाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असा इशारा मलिक यांनी दिला होता. त्याबाबत चंद्रकांत पाटलांना विचारण्यात आलं. त्यावर, अरे बाबा तुम्हाला कोणी अडविले? राज्य सरकार तुमचेच आहे. पहिला गृहमंत्री पळून गेला. आता दुसरा गृहमंत्री आहे. या धमक्या देने बंद करा. जे करायचे ते करा, असं आव्हानच चंद्रकांत दादांनी दिलं.

नीरज गुंडेंशी संबंध काय?

दरम्यान, नवाब मलिक यांनी नीरज गुंडे या व्यक्तीवरून भाजपवर टीका केली होती. नीरज गुंडे हा मागच्या सरकारचा दलाल आहे. सर्व शासकीय कार्यालयात याचा मुक्त वावर आहे. समीर वानखेडे सोबत ही नीरज गुंडेचे संबंध आहेत. एक माजी मुख्यमंत्री सुद्धा नीरज गुंडेच्या चेंबूरच्या घरी जाऊन बसत होते. ईडीच्या कार्यालयात ही नीरज गुंडेचा मुक्त वावर होता, असा दावा मलिक यांनी केला.

तुमच्या खिशात काय काय ते उघड करेन

तसेच एका प्रश्नाला उत्तर देताना नवाब मलिक यांना खिशात ठेवतो, असं विधानही त्यांनी केलं. त्यावर मलिक यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांतदादांचा खिसा इतका मोठा आहे हे मला माहीत नव्हतं. मी वाट बघतोय ते कधी त्यांच्या खिशात टाकतायत, असे प्रतिआव्हानच मलिक यांनी पाटील यांना दिलं. चंद्रकांतदादांनी मला त्यांच्या खिशात ठेवले तर मी त्यांच्या खिशात काय काय आहे हे जनतेसमोर आणेन असा इशारा देतानाच त्यासाठी चंद्रकांतजी मला तुमच्या खिशात टाका, असा टोलाही त्यांनी लगावला.

 

संबंधित बातम्या:

1 नोव्हेंबरपासून बँकेच्या ‘या’ नियमांत होणार बदल, जाणून घ्या सर्वकाही

रत्नागिरीतील नौका समुद्रात बेपत्ता, सहा खलाशांसोबत पाच दिवसांपासून संपर्क नाही

पुण्यात निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळला; मजूर ढिगाऱ्याखाली दबले, 12 जण जखमी

(chandrakant patil attacks nawab malik over sameer wankhede)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI