रत्नागिरीतील नौका समुद्रात बेपत्ता, सहा खलाशांसोबत पाच दिवसांपासून संपर्क नाही

नविद-2 ही नौका मासेमारीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड येथून 26 ऑक्टोबरला समुद्रात गेली होती. मात्र गेले पाच दिवस त्यांच्याशी कोणताही संपर्क न झाल्याने मालकाने जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

रत्नागिरीतील नौका समुद्रात बेपत्ता, सहा खलाशांसोबत पाच दिवसांपासून संपर्क नाही
रत्नागिरीतील बेपत्ता नविद नौका (फाईल फोटो)
Follow us
| Updated on: Oct 31, 2021 | 8:25 AM

रत्नागिरी : मासेमारीसाठी गेलेली रत्नागिरीच्या जयगडमधील नौका समुद्रात बेपत्ता झाली आहे. नविद-2 या नौकेवर तांडेलसह सहा खलाशी आहेत. गेल्या पाच दिवसांपासून या नौकेशी कुठलाही संपर्क होऊ शकलेला नाही. खोल समुद्रात प्रशासनाच्या तीन स्पीड बोटी, कोस्टगार्डची एक स्पीड बोट आणि काही खासगी बोटी युद्ध पातळीवर ‘सर्च ऑपरेशन’ करत आहेत.

नेमकं काय घडलं?

नविद-2 ही नौका मासेमारीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड येथून 26 ऑक्टोबरला समुद्रात गेली होती. मात्र गेले पाच दिवस त्यांच्याशी कोणताही संपर्क न झाल्याने मालकाने जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

स्थानिक मच्छिमारांची शोध मोहीम

नासीर हुसैन मिया संसारे यांच्या मालकीची ही मासेमारी नौका आहे. स्थानिक मच्छिमारांनी शोध मोहीम सुरु केली आहे. कोणाला काही माहिती मिळाल्यास जयगड पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बेपत्ता नौकेवर सहा खलाशी

दरम्यान, खोल समुद्रात प्रशासनाच्या तीन स्पीड बोटी, कोस्टगार्डची एक स्पीड बोट आणि काही खासगी बोटी यांच्याकडून युद्ध पातळीवर ‘सर्च ऑपरेशन’ हाती घेण्यात आले आहे. या बोटीवर तांडेल दगडु, गोविंद, दत्ता, अमोल, सूर्या, अनिल असे खलाशी आहे. हे सर्व साखरी आगर येथील राहणारे आहेत.

बिहारमध्ये बोट दुर्घटना

याआधी, बिहारमध्ये गंगा नदीत100 प्रवाशांनी भरलेली बोट उलटून गेल्या वर्षी अपघात झाला होता. भागलपूर जिल्ह्यातील नवगछिया भागात ही दुर्घटना घडली होती. या बोटीमध्ये लहान मुलं आणि महिलादेखील प्रवास करत होत्या. या बोटीत काही दुचाकी आणि सायकलदेखील ठेवल्या होत्या. बोट उलटल्यानंतर काही प्रवाशी पोहत समुद्र किनारा गाठला होता. तर काही जण बेपत्ता होते.

संबंधित बातम्या :

बिहारमध्ये गंगा नदीत मोठी दुर्घटना, 100 प्रवाशांनी भरलेली बोट उलटली, अनेक जण बेपत्ता

गणपती विसर्जनाला गालबोट; मुंबईत 5 मुले बुडाली; दोघांना वाचविण्यात यश, तर तिघे अद्याप बेपत्ता

राजस्थानच्या चंबळ नदीत 30 जणांसह बोट बुडाली, 5 जणांचा मृत्यू, 10 जण बेपत्ता, दृश्ये कॅमेऱ्यात कैद

Non Stop LIVE Update
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.