गणपती विसर्जनाला गालबोट; मुंबईत 5 मुले बुडाली; दोघांना वाचविण्यात यश, तर तिघे अद्याप बेपत्ता

पालिका सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गणपती विसर्जनादरम्यान अंधेरीच्या वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर रात्री 9 च्या सुमारास ही घटना घडली. विसर्जन करत असताना 5 मुले खोल समुद्राच्या दिशेने गेली. त्या मुलांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने पाचही मुले पाण्यामध्ये बुडाली.

गणपती विसर्जनाला गालबोट; मुंबईत 5 मुले बुडाली; दोघांना वाचविण्यात यश, तर तिघे अद्याप बेपत्ता
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Sep 20, 2021 | 12:59 AM

मुंबई : मुंबईसह संपूर्ण राज्यभरात आज अकरा दिवसांच्या गणरायाला भक्तीभावाने निरोप देण्यात आला. सगळीकडे भक्तिमय वातावरण असताना राज्यात काही ठिकाणी या विसर्जनाला गालबोट लागले. मुंबईच्या वर्सोवा समुद्रकिनारी रात्रीच्या सुमारास 5 मुले बुडाली. त्यातील दोन मुलांना वाचविण्यात स्थानिक नागरिकांना यश आले असून, उर्वरित तीन मुले अजून बेपत्ता आहेत. स्थानिक पोलीस, पालिका, अग्निशामक दल आणि तटरक्षक दलाच्या माध्यमातून या बेपत्ता मुलांचा शोध घेतला जात आहे. तसेच नौदलाचीही मदत घेण्यात येत आहे. अधूनमधून पावसाचा जोर वाढत असल्यामुळे मुलांचा शोध घेण्यात अडथळा येत आहे. (Five children drowned during Ganpati immersion in Mumbai; Succeeded in rescuing two, while three are still missing)

पालिका सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गणपती विसर्जनादरम्यान अंधेरीच्या वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर रात्री 9 च्या सुमारास ही घटना घडली. विसर्जन करत असताना 5 मुले खोल समुद्राच्या दिशेने गेली. त्या मुलांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने पाचही मुले पाण्यामध्ये बुडाली. ही घटना निदर्शनास येताच तेथील स्थानिक रहिवाश्यांनी तात्काळ धाव घेऊन मुलांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. यावेळी दोघांना वाचवण्यात आले, मात्र 3 मुलांचा अजून थांगपत्ता लागलेला नाही. बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाने गणपती विसर्जनादरम्यान तैनात केलेल्या जीवरक्षक तसेच अग्निशमन दलाच्या साहाय्याने बेपत्ता मुलांचा शोध घेतला जात आहे.

पुण्यात दोन मुले बुडाली; अमरावतीत एकाचा मृत्यू

पुणे जिल्ह्यातही गणपती विसर्जनादरम्यान दोन मुले बुडाली. मोशी आळंदी रोडवर इंद्रायणी नदी पात्रात गणपतींचे विसर्जन सुरू असताना दोन मुले बुडाल्याची घटना घडली. दत्ता ठोंबरे (20) आणि प्रज्वल काळे (18) अशी या मुलांची नाव आहे. प्रज्वल काळे हा ठोंबरे यांचा नातेवाईक होता. गणपतीनिमित्त तो पुण्यात आला होता. घटनेची खबर मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. बुडालेल्या मुलांपैकी एकाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्या मुलाचा शोध घेतला जात आहे. तसेच अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथील 17 वर्षीय अरमान पठाण या मुलाचा बासलापूर तलावात बुडून मृत्यू झाला. पोहताना गाळात पाय फसल्याने तो बुडाला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात काका आणि इतर दोन भाऊही गाळात फसले होते. पण, गणपती विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांनी त्यांचे प्राण वाचवले. मात्र अरमानच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे. (Five children drowned during Ganpati immersion in Mumbai; Succeeded in rescuing two, while three are still missing)

इतर बातम्या

ऋतुराज गायकवाडची दुबईत दबंगगिरी, बोल्ट-बुमराहची धुलाई करत मुंबईला नमवलं

Bigg Boss Marathi | कलाकारांपासून ते कीर्तनकारांपर्यंत जाणून घ्या बिग बॉस मराठीच्या घरातील 15 स्पर्धकांची नावं, आता अनलिमिटेड मनोरंजन !

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.