AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई मेट्रोमध्ये मोठी भरती, दर महिना 2 लाख 80 हजार पगार, अर्ज कसा कराल?

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) मध्ये जनरल मॅनेजर, ज्युनिअर इंजिनिअर आणि आयटी असिस्टंट पदांसाठी भरती सुरू झाली आहे. २.८० लाखांपर्यंत पगार मिळवण्याची ही सुवर्णसंधी असून, शैक्षणिक पात्रता आणि अर्जाची प्रक्रिया सविस्तर जाणून घ्या.

मुंबई मेट्रोमध्ये मोठी भरती, दर महिना 2 लाख 80 हजार पगार, अर्ज कसा कराल?
mumbai metro
| Updated on: Feb 12, 2026 | 3:45 PM
Share

जर तुम्ही इंजिनिअरींग किंवा आयटी क्षेत्रात करिअर करु इच्छिता आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) ने तुमच्यासाठी नोकरीची मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. मुंबई मेट्रोने विविध तांत्रिक आणि प्रशासकीय पदांसाठी भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. यामध्ये तरुणांना उच्च वेतनासह कामाचा चांगला अनुभव घेता येणार आहे.

कोणकोणत्या पदासाठी भरती?

या भरती मोहिमेद्वारे एकूण ६ रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना भरघोस वेतन दिले जाणार आहे. जनरल मॅनेजर पदासाठी दरमहा तब्बल २ लाख ८० हजार रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. तर ज्युनिअर इंजिनिअर आणि आयटी असिस्टंट या पदांसाठी सुरुवातीचे वेतन ३४,००० रुपयांपेक्षा जास्त असेल. यातील काही पदे ही कायमस्वरूपी आहेत, तर काही कंत्राटी तत्त्वावर भरली जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

१. जनरल मॅनेजर (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल): इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी असणे आवश्यक. संबंधित क्षेत्रात किमान १८ वर्षांचा अनुभव अनिवार्य.

२. असिस्टंट जनरल मॅनेजर: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी आणि ७ ते १० वर्षांचा कामाचा अनुभव.

३. डेप्युटी/ज्युनिअर इंजिनिअर: संबंधित शाखेतून (Civil/Electrical/Mechanical) इंजिनिअरिंग पदवी किंवा पदविका (Diploma) आवश्यक.

४. आयटी असिस्टंट: बी.एस्सी (आयटी/कॉम्प्युटर सायन्स) किंवा बी.सी.ए. (BCA) पदवी असणे गरजेचे आहे.

पद (Post Name) वेतन श्रेणी (अंदाजे मासिक) नोकरीचा प्रकार
जनरल मॅनेजर (GM) ₹१,२०,००० – ₹२,८०,००० रेगुलर / डेप्युटेशन
असिस्टंट जनरल मॅनेजर (AGM) ₹७०,००० – ₹२,००,००० कंत्राटी / रेगुलर
डेप्युटी इंजिनिअर ₹५०,००० – ₹१,६०,००० रेगुलर / कंत्राटी
ज्युनिअर इंजिनिअर ₹३५,२८० – ₹६७,९२० रेगुलर
आयटी असिस्टंट ₹३४,०२० – ₹६४,००० कंत्राटी

वयोमर्यादा

  • जनरल मॅनेजर: कमाल ५५ वर्षे.
  • इतर वरिष्ठ पदे: ४० ते ५० वर्षे.
  • ज्युनिअर इंजिनिअर व असिस्टंट: ३३ ते ३५ वर्षे

अर्ज कसा कराल?

ऑनलाईन अर्ज: सर्वप्रथम MMRCL च्या अधिकृत वेबसाईट www.mmrcl.com वर जाऊन ‘Careers’ विभागावर क्लिक करा. तेथे संबंधित भरतीची जाहिरात निवडून ‘Apply Online’ वर क्लिक करा.

कागदपत्रे: शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभवाचा दाखला आणि इतर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.

ऑफलाईन अर्ज (केवळ सरकारी कर्मचारी): जे उमेदवार आधीच सरकारी सेवेत आहेत आणि ‘डेप्युटेशन’साठी अर्ज करत आहेत, त्यांनी ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट काढावी. ही प्रिंट सीनियर डिप्टी जनरल मैनेजर (HR), मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, MMRCL-लाइन 3 ट्रांजिट ऑफिस, ई ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC), बांद्रा (पूर्व), मुंबई – ४०००५१ या पत्त्यावर पाठवावी.

Follow Us
राज्याच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? बड्या मंत्र्याची जागी मुंडेंना
राज्याच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? बड्या मंत्र्याची जागा घेणार धनंजय मुंडे?
मोठी बातमी! शिंदे महत्त्वाचा संदेश घेऊन दिल्लीत? राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! शिंदे महत्त्वाचा संदेश घेऊन दिल्लीत? राजकीय घडामोडींना वेग
फक्त एक अट, तर देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणतील,
फक्त एक अट, तर देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणतील, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
केद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी अपडेट! ताकाद वाढली मग
केद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी अपडेट! ताकाद वाढली मग शिवसेनेचा कोणत्या पदावार दावा? शिंदेंनी दिलं थेट उत्तर
पुण्यात खळबळ! पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी कनेक्शन, एकाच वेळी 60
पुण्यात खळबळ! पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी कनेक्शन, एकाच वेळी 60 हून अधिक...
सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरून पाठवलेल्या नोटीसमध्ये मोठा ट्विस्ट!
सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरून पाठवलेल्या नोटीसमध्ये मोठा ट्विस्ट! पत्रात मोठी विसंगती; 18 फेब्रुवारीशी काय कनेक्शन?
केंद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या पर्श्वभूमीवर मोठ्या हालचाली! दिल्ली
केंद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या पर्श्वभूमीवर मोठ्या हालचाली! दिल्ली दौऱ्याआधीच एकनाथ शिंदेंनी...
राजकीय हालचालींना वेग! NCP तील मंत्र्यांची तातडीची बैठक, काय घडणार?
राजकीय हालचालींना वेग! NCP तील मंत्र्यांची तातडीची बैठक, पुढे काय घडणार?
सिया केतन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर! थेट पंतप्रधानांना पत्र
सिया केतन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर! थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं पत्र
फक्त चर्चा की सत्य, राष्ट्रवादी पक्ष लवकरच फुटणार? बड्या नेत्याच्या
NCP | फक्त चर्चा की सत्य, राष्ट्रवादी पक्ष लवकरच फुटणार? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ