AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss Marathi | कलाकारांपासून ते कीर्तनकारांपर्यंत जाणून घ्या बिग बॉस मराठीच्या घरातील 15 स्पर्धकांची नावं, आता अनलिमिटेड मनोरंजन !

यावेळी कीर्तनकार, सामाजिक कार्यकर्ते यांनीसुद्धा बिग बॉसच्या घरात प्रवेश केला असून प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ते सज्ज आहेत. आजपासून पुढचे शंभर दिवस बिग बॉस मराठीच्या घरात मनोरंजन, भांडण, ड्रामा अन् बरंच काही पाहायला मिळणार आहे.

Bigg Boss Marathi | कलाकारांपासून ते कीर्तनकारांपर्यंत जाणून घ्या बिग बॉस मराठीच्या घरातील 15 स्पर्धकांची नावं, आता अनलिमिटेड मनोरंजन !
BIGG BOSS MARATHI
| Edited By: | Updated on: Sep 19, 2021 | 11:39 PM
Share

मुंबई : बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनला आजपासून सुरुवात झाली आहे. आज अधिकृतपणे बिग बॉस मराठीच्या घरात एकूण 15 स्पर्धकांचा प्रवेश झाला आहे. यावेळच्या स्पर्धकांमध्ये अभिनेते, अभिनेत्री यांचा समावेश आहे. मात्र विशेष बाब म्हणजे यावेळी कीर्तनकार, सामाजिक कार्यकर्ते यांनीसुद्धा बिग बॉसच्या घरात प्रवेश केला असून प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ते सज्ज आहेत. आजपासून पुढचे शंभर दिवस बिग बॉस मराठीच्या घरात मनोरंजन, भांडण, ड्रामा अन् बरंच काही पाहायला मिळणार आहे. (bigg boss marathi season 3 started know all contestants name and details information in marathi)

उत्सुकता संपली, आता अनलिमिटेड मनोरंजन

बिग बॉस मराठीच्या सिझन तीनध्ये स्पर्धक म्हणून कोण कोण येणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. त्यासाठी अनेक ठोकताळे बांधले जात होते. मात्र, ही उत्सुकता आता संपली आहे. सर्वच्या सर्व म्हणजेच एकूण 15 स्पर्धकांची नावं आता समोर आली आहेत. बिग बॉसच्या घरात प्रवेश केलेले सर्व स्पर्धक पाहून यावेळी प्रेक्षकांना अनलिमिटेड मनोरंजन मिळेल याची खात्री दिली जात आहे.

बिग बॉसच्या घरात कोणाचा प्रवेश

बिग बॉसच्या घरात कोणाकोणाचा प्रवेश होणार याची अनेकांना उत्सुकता लागली होती. आज बिग बॉस मराठीच्या सिझन तीनचा प्रिमियर शो पार पडला. यावेळच्या सर्वच स्पर्धकांनी मोठ्या थाटामाटात बिगबॉसच्या घरात प्रवेश केला. यामध्ये बिग बॉसच्या घरात सर्वात आधी प्रेवश करण्याचा मान देवमाणूस या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या सोनाली पाटीलला मिळाला. त्यानंतर बिग बॉसच्या घरामध्ये अभिनेता विशाल निकम, गायक उत्कर्ष शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई, किर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील तसेच इतरांनी प्रवेश केला.

बिग बॉस मराठीच्या सिझन तीमधील स्पर्धकांची नावे

अभिनेत्री सोनाली पाटील

अभिनेता विशाल निकम

गायक उत्कर्ष शिंदे

अभिनेत्री मीरा जगन्नाथ

अभिनेत्री स्नेहा वाघ

अभिनेता अविष्कार दारव्हेकर

सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई

सुरेखा कुडची

अभिनेत्री ‘गायत्री दातार’

किर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील

अभिनेता विकास पाटील

अभिनेता जय दुधाणे

अभिनेत्री मीनल शाह

अभिनेता अक्षय वाघमारे

संतोष चौधरी

दरम्यान, बिग बॉस मराठीच्या सीझन तीनचे सूत्रसंचालन अभिनेते तसेच दिग्दर्शक महेश मांजरेकर करणार आहेत. यावेळी मांजरेकर यांच्या माध्यमातून बिग बॉस स्पर्धकांना कोणते टास्क देणार ? मागच्या सीझनप्रमाणेच यावेळीसुद्धा तसाच ड्रामा पाहायला मिळणार का ? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

इतर बातम्या :

राज कुंद्राचे दोन साथीदार अद्याप मोकाटच, दोघेही परदेशात असल्याने अटक नाही

Sonu Sood : रिच ग्रुपशी सोनू सूदचे संबंध असल्याची माहिती, आजही 4 ठिकाणांवर आयकर विभागाचे छापे सुरु

रणवीर सिंहच्या Ask Me Anything मध्ये दीपिकाचा भन्नाट प्रश्न? रणवीरच्या उत्तरावर नेटकऱ्यांनी घेतली फिरकी

(bigg boss marathi season 3 started know all contestants name and details information in marathi)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.