AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sonu Sood : रिच ग्रुपशी सोनू सूदचे संबंध असल्याची माहिती, आजही 4 ठिकाणांवर आयकर विभागाचे छापे सुरु

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सोनू सूदचे कानपूरच्या रिच ग्रुपशी संबंध असल्याची माहिती आहे. सोनू सूदवर बनावट कर्ज घेऊन पैसे गुंतवण्याचे प्रकरण समोर आले आहे.

Sonu Sood : रिच ग्रुपशी सोनू सूदचे संबंध असल्याची माहिती, आजही 4 ठिकाणांवर आयकर विभागाचे छापे सुरु
Sonu Sood
| Edited By: | Updated on: Sep 19, 2021 | 2:53 PM
Share

नवी दिल्ली: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सोनू सूदचे कानपूरच्या रिच ग्रुपशी संबंध असल्याची माहिती आहे. सोनू सूदवर बनावट कर्ज घेऊन पैसे गुंतवण्याचे प्रकरण समोर आले आहे. आयकर विभागाचे अधिकारी रिच समूहाच्या विविध ठिकाणांवर छापे टाकत आहेत. सोनू सूदशी संबंधित आर्थिक तपास देखील सध्या जोरात सुरू आहे. आयकर विभागाला बोगस पावत्या देण्याचे आणि त्या विकल्या गेल्याचे गाही पुरावे मिळाले आहेत. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला कंपनीचा संचालक केल्याचंही प्रकरण समोर आलं आहे.

रिच ग्रुप कंपनीजवर छापे

जागरण डॉट कॉमनुसार, जीएसटी विभागाकडून मिळालेल्या माहितीनंतर प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी रिच ग्रुप ऑफ कंपनीजवर छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. जिथे या कंपनीमध्ये तीन भाऊ आहेत, ज्यांची नावे तत्वेश अग्रवाल, आशेष अग्रवाल आणि शाश्वत अग्रवाल आहे. आयकर विभागाच्या टीमला छापे टाकल्यानंतर आणखी 15 कंपन्या देखील संबंधित असल्याची माहिती मिळाली आहे. ज्या पूर्णपणे बनावट आहेत. या सर्व कंपन्या एकमेकांना फक्त पावत्या देत असत. यापैकी काही कंपन्या जीएसटीवर चालत आहेत. तर, अनेक व्हॅटच्या काळापासून चालत आहेत. आयकर विभागाच्या लोकांनी रिच ग्रुपच्या कार्यालयातून सर्व संगणक ताब्यात घेतले आहेत आणि त्यांचा तपास त्वरित सुरू केला आहे. जिथे आता सोनू सूदचे देखील या कंपनीशी संबंध असल्याचं समोर येत आहे.

विदेशी देणग्या गोळा केल्याची माहिती

सोनू सूदच्या घरी गेल्या 4 दिवसांपासून आयकर विभागाचे सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणादरम्यान मुंबई, लखनौ, कानपूर, जयपूर, दिल्ली आणि गुरुग्राम येथे छापे टाकण्यात आले आहेत. सोनू सूदने अनेक कंपन्यांच्या बनावट नोंदी दाखवून मालमत्ता खरेदी केल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये कंपनीने बनावट नोंद दाखवून रोख रकमेद्वारे धनादेश दिला आहे. एका संस्थेच्या माध्यमातून कोट्यवधी विदेशी देणग्या देखील गोळा केल्या असल्याचं समोर आल्याची माहिती आहे. फेमा कायद्याचं उल्लंघन केल्याचे समोर आल्याचं बोललं जातंय.

सोनू सूदवर 20 कोटी रुपयांच्या करचोरीचा आरोप

आयकर विभाग (IT Department ) अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) च्या मुंबई आणि लखनऊ येथील इन्फ्रास्ट्रक्चर ग्रुपच्या काही ठिकाणी आयकर पथकाने छापे टाकले आहेत. मुंबई, लखनऊ, कानपूर, जयपूर, दिल्ली आणि गुरुग्राम येथील 28 ठिकाणी एकाच वेळी शोध मोहीम सुरू होती. आयकर विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता सोनू सूद आणि त्याच्या जवळच्या व्यावसायिकांच्या ठिकाणांच्या शोधादरम्यान करचोरीशी संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. सोनू सूदने या प्रकरणात 20 कोटींची करचोरी केल्याचा आरोप आयकर विभागानं केला आहे.

इतर बातम्या:

Television Celebrities : कपिल शर्मापासून दिव्यांका त्रिपाठीपर्यंत हे 7 सेलेब्स एका एपिसोडमधून करतात लाखोंची कमाई

Bigg Boss Marathi 3 : बिग बॉस मराठी 3 पर्वाची सुरुवात ग्रँड प्रीमिअरनं होणार, कुठे आणि किती वाजता पाहायचे एपिसोड

Sonu Sood has strong connections with Rich Group said sources Income Tax Department’s action is going on at 4 locations

काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.