पेट्रोलच्या वाढत्या किंमतीमुळे हैराण आहात? ‘या’ जबरदस्त मायलेजवाल्या 5 स्कूटर खरेदी करा

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 19, 2021 | 11:08 PM

महागड्या पेट्रोलमुळे बहुतांश दुचाकीस्वार त्रस्त आहेत. प्रत्येकजण आता मायलेजच्या (Mileage) मागे धावत आहे. बाजारात दमदार मायलेज असलेल्या अनेक बाईक्स बाजारात उपलब्ध आहेत,

पेट्रोलच्या वाढत्या किंमतीमुळे हैराण आहात? 'या' जबरदस्त मायलेजवाल्या 5 स्कूटर खरेदी करा

Follow us on

मुंबई : महागड्या पेट्रोलमुळे बहुतांश दुचाकीस्वार त्रस्त आहेत. प्रत्येकजण आता मायलेजच्या (Mileage) मागे धावत आहे. बाजारात दमदार मायलेज असलेल्या अनेक बाईक्स बाजारात उपलब्ध आहेत, पण स्कूटरच्या बाबतीत हे प्रकरण थोडे वेगळे आहे. भारतातील सर्वात जास्त मायलेज असलेली स्कूटी कोणती आहे हे तुम्हाला माहिती आहे का? आज आम्ही तुम्हाला अशा 5 स्कूटर्सबद्दल सांगणार आहोत, ज्या मायलेजमध्ये चांगल्या आहेत आणि किंमतही जास्त नाही. (Buy these 5 scooters with high mileage – Suzuki Access 125, Yamaha Fascino 125 FI, Hero Pleasure Plus)

Suzuki Access 125

Suzuki Access 125 ची सुरुवातीची किंमत जवळपास 73,267 हजार रुपये इतकी आहे. ही स्कूटर चार व्हेरिएंट आणि 6 रंगांमध्ये उपलब्ध आहे. 125cc इंजिन असलेली ही जबरदस्त मायलेजवाली स्कूटी आहे. ही स्कूटी एक लीटर पेट्रोलमध्ये 64 किमी पर्यंत धावू शकते असा कंपनीचा दावा आहे.

Yamaha Fascino 125 FI

यामाहा Fascino 125 FI ची किंमत भारतात 72,030 रुपये (एक्स-शोरूम) आहे. या स्कूटरचं डिझाईन जास्त चांगलं आहे, त्यामुळे या स्कूटरबद्दल तरुणांमध्ये क्रेझ आहे. यामाहा Fascino 125 एफआय स्कूटीने 125 सीसी सेगमेंटमध्ये चांगल्या मायलेजसाठी आपली ओळख निर्माण केली आहे. कंपनीच्या मते, ही स्कूटर 63 किमी / लीटर मायलेज देण्यास सक्षम आहे.

Hero Pleasure Plus

जगातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्पची Pleasure Plus स्कूटर 63 किमी / लीटर मायलेज देण्यास सक्षम आहे. ही स्कूटर तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. स्कूटरमध्ये 110.9 सीसी क्षमतेचे सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आलं आहे, जे 8.1 पीएस पॉवर आणि 8.7 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर दिल्लीत या स्कूटरची सुरुवातीची किंमत 58,900 हजार रुपये इतकी आहे.

TVS Scooty Pep Plus

टीव्हीएसची ही स्कूटर मायलेजमध्ये चांगली आहे, तसेच ग्राहकांच्या खिशासाठी फार जड नाही. कंपनी टीव्हीएस स्कूटी पेप प्लसमध्ये 65 किमी प्रति लीटर मायलेज असल्याचा दावा करते. यात 87.8cc क्षमतेचे सिंगल सिलेंडर इंजिन आहे जे 5.4 PS ची शक्ती आणि 6.5 Nm चे पीक टॉर्क जनरेट करते. भारतीय बाजारात या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 56,009 हजार रुपये इतकी आहे.

Honda Dio

मायलेजच्या शर्यतीत तुम्ही Honda Dio ही स्कूटर विसरू शकत नाही. ही स्कूटर सुमारे 55 kmpl चे मायलेज देण्यास सक्षम आहे. कंपनीने अलीकडेच ती एका नवीन लूकसह लॉन्च केली आहे. 110 सीसी इंजिन असलेल्या होंडा Dio ची दिल्लीत एक्स-शोरूम किंमत 63,273 रुपये आहे. याशिवाय, होंडा अॅक्टिव्हा 109.5 सीसी इंजिन असलेली स्कूटर आहे, जी 60 किमी/लीटर मायलेज देण्यास सक्षम आहे.

तर बातम्या

ओला इलेक्ट्रिक स्कूटरची कमाल! दोन दिवसांत तब्बल 1100 कोटींची कमाई

होंडा एन7एक्स मिडसाईज एसयुव्ही 21 सप्टेंबरला लॉन्च होणार, ह्युंडाई क्रेटा आणि किया सेल्टोससारख्या कारशी असेल स्पर्धा

PHOTO | डस्टर ते हॅरियर पर्यंतच्या बेस्ट मिडसाईज एसयूव्हीवर मोठी सवलत, जाणून घ्या तपशील

(Buy these 5 scooters with high mileage – Suzuki Access 125, Yamaha Fascino 125 FI, Hero Pleasure Plus)

Non Stop LIVE Update

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI