Lalbaugcha Raja 2026 : डोळे विस्फारतील इतक्या किंमतीला लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेल्या 24 कॅरेट सोन्याच्या वीटेचा लिलाव

Lalbaugcha Raja 2026 : गणेशोत्सवात लालबागचा राजाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. भाविकांकडून राजाच्या चरणी विविध वस्तू अर्पण केल्या जातात. दरवर्षीप्रमाणे यंदाही राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दान आले आहे.

Lalbaugcha Raja 2026 : डोळे विस्फारतील इतक्या किंमतीला लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेल्या 24 कॅरेट सोन्याच्या वीटेचा लिलाव
Lalbaugcha Raja 2026
| Updated on: Oct 01, 2026 | 10:26 AM

गणेशोत्सव संपल्यानंतर चर्चा असते ती लालबागच्या राजाच्या चरणी अपर्ण केलेल्या वस्तूंच्या लिलावाची. दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांनी लालबागच्या राजाच्या चरणी भरभरुन दान दिलं. यात सोन्या-चांदीचे दागिने होतेच. पण राजाच्या एका भक्ताने चक्क सोन्याची वीट अपर्ण केली होती. एक भक्ताने दोन मोटरसायकल अर्पण केल्या. सध्या लालबागचा राजा मंडळाकडून या वस्तूंचा लिलाव सुरु आहे. लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेली सोन्याच्या वीटेची सर्वाधिक चर्चा आहे. या सोन्याच्या वीटेचा तब्बल 1 कोटी 55 लाख रुपयांना लिलाव झाला. लालबागच्या राजाला यंदा एका अज्ञात भाविकांने एक किलो 24 कॅरेटची सोन्याची वीट अर्पण केली. या सोन्याच्या वीटेची मूळ किंमत 1 कोटी 48 लाख रुपये होती. सध्या लालबागचा राजाच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेल्या सोने-चांदीच्या दागिन्यांचा लिलाव सुरु आहे. एका अज्ञात भाविकाने 18 कॅरेट सोन्याची 141 ग्रॅम वजनाची गणेश मूर्ती अर्पण केली. या गणेश मुर्तीची किंमत 15 लाख 65 हजार रूपये आहे.

लालबागचा राजाच्या दागिन्यांच्या विक्रीतून आतापर्यंत 3 कोटी 22 लाख रुपये जमा झाले आहेत. लिलावात तब्बल 85 वस्तूंची विक्री करण्यात आली. त्यातून 3 कोटी 22 लाख 28 हजार रुपये जमा झाले आहेत, अशी माहिती लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी दिली. गणेशोत्सवात लालबागचा राजाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. भाविकांकडून राजाच्या चरणी विविध वस्तू अर्पण केल्या जातात. दरवर्षीप्रमाणे यंदाही राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दान आले आहे.

Loading...

राजाकडे बोललेला नवस पूर्ण होतो, अशी भक्तांची धारणा

लिलावात 85 वस्तूंची विक्री करण्यात आली. यात अनेक सोन्याचांदीचे दागिने, मोदक, चांदीच्या गदा, क्रिकेट बॅट आणि दोन मोटरसायकलचा समावेश होता. लालबागचा राजा हा देशभरातली कोटयवधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. लालबाग राजाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. लालबागच्या राजाला नवसाचा गणपती म्हटलं जातं. राजाकडे बोललेला नवस पूर्ण होतो, अशी भक्तांची धारणा आहे. म्हणून दरवर्षी लालबाग राजाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांपैकी काही जण इच्छापूर्ती झाली म्हणून सोन्या-चांदीचे दागिने सुद्धा अपर्ण करतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us