नवी मुंबईकरांसाठी खुशखबर, सिडकोच्या उर्वरित घरांच्या लॉटरीचा शुभारंभ

| Updated on: Nov 29, 2019 | 7:07 PM

सिडकोने नुकतंच नवीन गृहनिर्माण योजनांबरोबरच आपल्या पूर्वीच्या गृहनिर्माण योजनांमधील उर्वरित घरे उपलब्ध करुन दिली (CIDCO Balance house Lottery) आहे.

नवी मुंबईकरांसाठी खुशखबर, सिडकोच्या उर्वरित घरांच्या लॉटरीचा शुभारंभ
Follow us on

नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये आपल्या हक्काचे घेण्याचे स्वप्न लवकरच साकार होणार (CIDCO Balance house Lottery) आहे. सिडकोने नुकतंच नवीन गृहनिर्माण योजनांबरोबरच आपल्या पूर्वीच्या गृहनिर्माण योजनांमधील उर्वरित घरे उपलब्ध करुन दिली (CIDCO Balance house Lottery) आहे. सिडकोच्या वास्तुविहार सेलिब्रेशन आणि उन्नती गृहनिर्माण योजनेतील उर्वरित 76 घरांच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीचा शुभारंभ काढले आहेत. त्यामुळे हक्काचे घर घेणाऱ्यांचे स्वप्न लवकरच पूर्ण (CIDCO Balance house Lottery) होणार आहे.

गृहनिर्माण योजनांपैकी वास्तुविहार सेलिब्रेशन गृहनिर्माण योजनेतील उर्वरित 45 तर उन्नती गृहनिर्माण योजनेतील उर्वरित 31 अशी एकूण 76 घरे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. वास्तुविहार सेलिब्रेशन योजनेतील घरे ही 1 आरके, 1 बीएचके आणि 2 बीएचके आहेत. तर उन्नती गृहनिर्माण योजनेतील घरे ही 1 आरके आणि 1 बीएचके प्रकारातील आहेत.

वास्तुविहार सेलिब्रेशन हे खारघरच्या निसर्गरम्य परिसरात विकसित करण्यात आलेले गृहसंकुल आहे. या गृहसंकुलापासून खारघर रेल्वे स्थानक नजीकच्या अंतरावर असून हा परिसर सर्व प्रकारच्या नागरी सोयीसुविधांनी युक्त आहे.

तर उन्नती गृहसंकुल हे सदस्थितीत नवी मुंबईतील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या उलवे नोडमध्ये आहे. नेरुळ-उरण रेल्वेमार्गावरील बामणडोंगरी रेल्वे स्थानकन नजीकच्या अंतरावर (CIDCO Balance house Lottery) आहे.

उन्नती गृहसंकुल परिसर हा जेएनपीटीसह प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक मार्ग आणि नेरुळ-उरण रेल्वे मार्गावरील प्रस्तावित तरघर रेल्वे स्थानक येथून नजीकच्या अंतरावर आहे.

या गृहनिर्माण योजनेशी संबंधित विविध प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहेत. यासाठी सिडकोतर्फे https://lottery.cidcoindia.com ही वेबसाइट दिली आहे. योजनेचे वेळापत्रक, अर्ज नोंदणी प्रक्रिया, सदनिकांचा तपशील, अनामत रक्कम, सदनिकेची अंदाजे किंमत इ. सर्व माहिती या वेबसाइटवर देण्यात आलेल्या योजना पुस्तिकेमध्ये देण्यात आली आहे. यामुळे अर्जदारांनी अर्ज भरण्यापूर्वी योजना पुस्तिकेचे काळजीपूर्वक वाचन करावे. या योजना पुस्तिकेचे शुल्कही ऑनलाइन भरावे लागणार आहे.