महाज्योतीच्या माध्यमातून पीएचडी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; शिष्यवृत्तीत होणार 10 हजारची वाढ

विद्यार्थ्यांच्या संशोधनासाठी चालू करण्यात आलेल्या या शिष्यवृत्तीत वाढ केला गेल्याने सरकारवर या शिष्यवृत्तीसाठी 35 कोटींचा वार्षिक खर्च करावा लागणार आहे.

महाज्योतीच्या माध्यमातून पीएचडी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; शिष्यवृत्तीत होणार 10 हजारची वाढ
महाज्योतीच्या माध्यमातून पीएचडी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; शिष्यवृत्तीत होणार 10 हजारची वाढ
Image Credit source: twitter
| Updated on: May 04, 2022 | 8:13 PM

मुंबईः राज्यात ओबीसी आरक्षणाच्या (OBC reservation) मुद्यावरुन राजकारण तापत असतानाच महाज्योतीच्या (Mahajyoti) माध्यमातून पीएचडी (Ph.D) करणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी सरकारने एक चांगला निर्णय घेतला आहे. ओबीसी वर्गातील जे विद्यार्थी संशोधन करत आहेत, त्यांच्या मासिक शिष्यवृत्तीत (Monthly Scholarship) घसघशीत वाढ करण्यात आली आहे. या आधी संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना 21 हजार रुपये मासिक शिष्यवृत्ती मिळत होती, त्या शिष्यवृत्तीत वाढ करुन आता विद्यार्थ्यांना 31 हजारापर्यंत शिष्यवृत्ती मिळणार आहे.

शिष्यवृत्तीसाठी 35 कोटींचा वार्षिक खर्च

महाज्योतीच्या माध्यमातून पीएचडीकरिता 753 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे, त्यांना या शिष्यवृत्तीचा फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांना देण्यात या शिष्यवृत्तीमुळे सरकारवर साडेचार कोटींचा अतिरिक्त भार पडणार आहे. विद्यार्थ्यांच्या संशोधनासाठी चालू करण्यात आलेल्या या शिष्यवृत्तीत वाढ केला गेल्याने सरकारवर या शिष्यवृत्तीसाठी 35 कोटींचा वार्षिक खर्च करावा लागणार आहे.

विद्यापीठातील विद्यार्थ्यांना फायदा

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे संशोधन करणाऱ्या वेगवेगळ्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना फायदा आणि हातभार लागणार आहे. संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक साहाय्य मिळणार असल्याने विद्यार्थ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

ओबीसी आरक्षणाचे भवितव्य

राज्यातील ओबीसी आरक्षणाच्या न्यायालयाच्या निकालानंतर उद्या महाविकास आघाडीची मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली बैठक होणार आहे. ही महत्वाची बैठक होणार असून ओबीसी आरक्षणाचे भवितव्य, कोर्टाच्या निकालाचे विश्लेषण, आगामी निवडणूका याबाबत या बैठकीत यावर चर्चा होणार असून दुपारी 1 वाजता वर्षा बंगल्यावर ही बैठक होणार आहे.

दिग्गज नेत्यांची बैठक

या बैठकीत महाविकास आघाडीतील प्रमुख नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार आहेत. यावेळी वकिलांची टीम व वकीलही उपस्थित राहणार आहेत.