Devendra Fadnavis: SIR प्रक्रियेबाबत देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची घोषणा… पात्र मतदारांना मुख्यमंत्र्यांचे काय आवाहन?
Devendra Fadnavis on SIR: देशात मतदार पुनर्निरीक्षण प्रक्रियेवरून घमासान सुरू आहे. गेल्या 15 दिवसांपासून राजधानी दिल्लीसह देशाच्या कानाकोपऱ्यात आंदोलनं सुरू आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयआर प्रक्रियेबाबत मोठी घोषणा केली आहे.

Devendra Fadnavis on SIR: मतदार पुनर्निरीक्षण प्रक्रिया, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यावरून देशभरात रणकंदन सुरू आहे. इंडिया आघाडी, काँग्रेस, CJP ने आंदोलनाची राळ उडवून दिली आहे. ही प्रक्रियाच रद्द करण्याची विरोधकांची मागणी आहे. सर्वोच्च न्यायालयातही हा मुद्दा समोर आला आहे. या गदारोळात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयआर प्रक्रियेबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यांनी राज्यात या प्रक्रियेला मुदत वाढ जाहीर केली आहे. यामुळे मतदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांना त्यांचे नाव पुन्हा मतदार यादीत नोंदवण्याची संधी मिळणार आहे.
मुदतवाढीचा नागरिकांना फायदा
मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून याविषयीची माहिती दिली आहे. ज्या नागरिकांची नावं प्रारुप मतदार यादीतून वगळण्यात आली आहे. नावांमध्ये चूक झाल्यास, स्पेलिंगमध्ये बदल असल्यास, दुरुस्ती करायची असल्यास अशा नागरिकांना या मुदतवाढीचा मोठा फायदा होणार आहे. सर्व नागरिकांना आता 26 ऑक्टोबरपर्यंत हरकती नोंदवता येतील. संबंधित निवडणूक अधिकारी कार्यालय आणि ऑनलाईनच्या माध्यमातून हरकती नोंदवता येतील.
मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी 26 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ!
मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकती दाखल करण्यासाठी निवडणूक आयोगाने 26 ऑक्टोबर 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
📌 सुधारित वेळापत्रक
✅ दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी : 31 ऑगस्ट ते 26 ऑक्टोबर 2026
✅ दावे व हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया : 31 ऑगस्ट ते 10 नोव्हेंबर 2026
✅ अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार : 16 नोव्हेंबर 2026
पात्र मतदारांनी काय करावे?
प्रारूप मतदार यादीत आपले नाव व तपशील तपासा. नाव वगळले असल्यास नाव समाविष्ट करण्यासाठी, नोंदीत चूक असल्यास दुरुस्तीसाठी किंवा आवश्यकतेनुसार हरकत नोंदवण्यासाठी 26 ऑक्टोबर 2026 पूर्वी संबंधित अर्ज दाखल करा.
मतदार यादी अचूक व अद्ययावत राहावी आणि प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा हक्क सुनिश्चित व्हावा, यासाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे. त्यामुळे पात्र नागरिकांनी या मुदतवाढीचा लाभ घ्यावा.
#Maharashtra #SIR #ElectionCommission
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 13, 2026
महत्त्वाच्या तारखा आणि वेळापत्रक
एसआयआर प्रक्रियेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची पोस्ट
मतदार यादीवरील दावे व हरकतींसाठी 26 ऑक्टोबर पर्यंत मुदत वाढ
प्रारूप यादीतून नाव वगळलेल्या व नावातील चूक दुरुस्तीसाठी संधी
दावे व हरकती दाखल करण्यासाठी 26 ऑक्टोबर पर्यंत संधी
10 नोव्हेंबर पर्यंत दावे व हरकती निकाली निघणार
16 नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार
पात्र मतदारांना अर्ज करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
16 नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी
मुख्यमंत्र्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टनुसार 26 ऑक्टोबरपर्यंत नागरिकांकडून जे दावे, हरकती येतील त्याची प्रशासनाकडून छाननी करण्यात येतील. 10 नोव्हेंबरपर्यंत या सर्व अर्जांचा निपटारा करण्यात येईल. त्यानंतर आवश्यक सुधारणांसह 16 नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात येईल. एसआयआर प्रक्रियेत नाव वगळण्यात आले असेल. नावात बदल असेल तर तात्काळ अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पात्र मतदारांनी अर्ज करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.