Special Story : राज्यात किती टक्के दुष्काळ जाहीर? शेतकऱ्यांना काय मिळणार? एका क्लिकवर समजून घ्या दुष्काळ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात ७५% दुष्काळ जाहीर केला आहे, ज्यात २५६ तालुके समाविष्ट आहेत. शेतकऱ्यांसाठी पीक कर्जाचे पुनर्गठन, वीजबिलात सूट, तसेच शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क माफी यासह अनेक दिलासादायक उपाययोजना घोषित केल्या आहेत.

भयंकर दुष्काळाने होरपळणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर आज राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला आहे. दोन दिवसात दुष्काळाचा जीआर काढणार असल्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी हा दुष्काळ जाहीर केला आहे. शेतकऱ्यांचं पीक वाया गेलं आहे. जनावरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा होता. आता त्यातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ट्रिगर एक लागू झालेल्या जिल्ह्यांमध्ये हा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. शेतकऱ्यांचं कुटुंब जगवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली आहे.
किती टक्के दुष्काळ जाहीर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात 75 टक्के दुष्काळ जाहीर केला आहे. ट्रिगर एक लागू झालेल्या राज्यातील 256 तालुक्यात हा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यात हा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. याचा अर्थ 93 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला नाही. या भागात समाधानकारक पाऊस पडल्याने तिथे दुष्काळ जाहीर करण्यात आलेला नाही.
शेतकऱ्यांना फायदा काय?
सरकारने दुष्काळ जाहीर करतानाच शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या उपाययोजनाही जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचं पुनर्गठन करण्यात येणार आहे. शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीलाही स्थगिती देण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या कृषीपंपाच्या चालू वीजबिलात सूट देण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी या फायद्याच्या घोषणा सरकारने केल्या आहेत.
शाळांची फी माफ
ज्या भागात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्या ठिकाणी शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी देण्यात आली आहे. त्यामुळे मुलांना शिक्षण घेण्यात कोणताही अडथळा येणार नाही. रोजगार हमी योजने अंतर्गत नियमात शिथिलता आणून अधिकाधिक कामे सुरु करण्यात येणार आहे. तसेच ज्या भागात टँकर्सची गरज आहे, त्या ठिकाणी टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे.
ज्या भागात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्या गावात शेतकर्यांच्या शेतीपंपाला अखंडीत वीजजोडणी सुरू राहणार आहे. त्यांची वीज जोडणी कापण्यात येणार नाही. शेतमजूर आणि शेतीवर अवलंबून असणाऱ्यांना अन्न धान्याचा पुरवठा करण्यात येणरा आहे. पुढचे आठ महिने पाणी टंचाईचे असल्याने जनावरांना चारा आणि पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
दुष्काळ पडू नये म्हणून…
पुढच्यावर्षी दुष्काळ पडू नये म्हणून सरकारने खबरदारीच्या उपाययोजना हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार आहेत. जेणे करून पुढच्या पावसात पाणी अडवणं सोपं जाणार आहे.