Mumbai Pune Home: तुम्ही घर घ्यायचा विचार करताय? मुंबई, पुणे, ठाण्यासह प्रमुख शहरात घरांच्या किंमती वाढल्या, वाचा सविस्तर

| Updated on: Apr 01, 2022 | 9:35 PM

राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर यांनी राज्यातील सुधारित रेडिरेकनरचे दर जाहीर केले. सप्टेंबर 2020 पासून रेडिरेकनरमध्ये वाढ करण्यात आली नव्हती.

Mumbai Pune Home: तुम्ही घर घ्यायचा विचार करताय? मुंबई, पुणे, ठाण्यासह  प्रमुख शहरात घरांच्या किंमती वाढल्या, वाचा सविस्तर
प्रातिनिधीक फोटो
Image Credit source: RoofandFloor
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्त्वातील सरकारनं कोरोना संसर्गामुळं जारी करण्यात आलेले निर्बंध मागं घेण्याचा निर्णय घेतला. राज्यातील जनतेला एका बाजूला दिलासा देणारा निर्णय घेत असतानाच दुसरीकडे राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर (Shravan Hardikar) यांनी राज्यातील सुधारित रेडीरेकनरचे दर जाहीर केले. सप्टेंबर 2020 पासून रेडिरेकनरमध्ये वाढ करण्यात आली नव्हती. 2021 मध्ये राज्य सरकारनं रेडिरेकनरमध्ये वाढ केली नव्हती. आता राज्यात सरासरी 5 टक्के वाढ करण्यात आली आहे. आजपासून वार्षिक मूल्यदरात वाढ लागू करण्यात आली आहे. त्यामुळं मुंबई (Mumbai), पुणे आणि ठाण्यासह प्रमुख शहरांमध्ये घरांच्या किमती वाढणार आहेत. सर्वाधिक रेडीरेकनरचा दर मालेगावमध्ये वाढला आहे. तर, मुंबई बाहेर चंद्रपूरमध्ये सर्वात कमी वाढ झाली आहे. ग्रामीण भागातील विकास पाहता तिथे देखील वाढ कऱण्यात आली आहे.

मालेगावात सर्वाधिक वाढ तर मुंबई बाहेर चंद्रपूरमध्ये सर्वात कमी वाढ

श्रावण हर्डीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वाधिक 13.12 टक्के वाढ मालेगाव महापालिका क्षेत्रात करण्यात आली आहे. तर, सर्वात कमी वाढ चंद्रपूरमध्ये 2.45 टक्के रेडिरेकनर वाढवण्यात आला आहे. पिंपरी चिचंवड महापालिका क्षेत्रात 12.36 टक्के वाढ करण्यात आलीय.

मुंबई आणि मुंबई उपनगरांमधील स्थिती काय?

मुंबई महापालिका क्षेत्रात रेडिरेकनर दर 2.34 टक्केंनी वाढवण्यात आला आहेत. तर, उल्हासनगरमध्ये 9.81, ठाणे 9.48, पनवेलमध्ये 9.24, वसई विरारमध्ये 9, नवी मुंबई 8.90 आणि मीरा भाईंदरमध्ये 8.30 असा रेडीरेकनर दर वाढणार आहे.

ग्रामीण भागात 6.96 टक्के वाढ

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील बदलती स्थिती, ग्रामीण भागातील जमीन विक्रीचं प्रमाण लक्षात घेता राज्यातील ग्रामीण भागात रेडीरेकनर दर 6.96 टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. तर,नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रात 3.62 टक्के वाढ करण्यात आली आहे.

घरांच्या किमती वाढणार

राज्य सरकारनं रेडिरेकनरच्या किमतीत वाढ केल्यानं मुंबई, पुणे आणि ठाण्यासह प्रमुख शहरात घर खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला आर्थिक झळ बसणार आहे. राज्यातील घरांच्या किमती साधारणपणे 5 ते 10 टक्केपर्यंत वाढू शकतात. उदा. एखादा व्यक्ती घर 25 लाखांना घर खरेदी करणार असेल तर त्यामध्ये 2.5 लाख रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या :

Ready Reckoner |पुणे व पिंपरी-चिंचवड रेडी रेकनरच्या दर वाढची अंमलबजावणी शासनाच्या मान्यतेनंतर

रेडीरेकनरच्या दरांत झालेल्या वाढीनं गृहस्वप्न महागलं! जाणून घ्या, तुमच्या परिसरात रेडीरेकनरची नेमकी किती वाढ?