रेडीरेकनरच्या दरांत झालेल्या वाढीनं गृहस्वप्न महागलं! जाणून घ्या, तुमच्या परिसरात रेडीरेकनरची नेमकी किती वाढ?

Ready reckoner rates in Maharashtra : राज्यात ग्रामीण भागातील रेडीरेकनरच्या दरात सरासरी 6.96 टक्के वाढ करण्यात आली आहे. तर नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या क्षेत्रात 3.62 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.

रेडीरेकनरच्या दरांत झालेल्या वाढीनं गृहस्वप्न महागलं! जाणून घ्या, तुमच्या परिसरात रेडीरेकनरची नेमकी किती वाढ?
घरांच्या किंमती रेडीरेकनरच्या वाढलेल्या दरांमुळे वाढणार..Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 31, 2022 | 9:28 PM

पुणे : राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक आयुक्त श्रावण हर्डीकर (Shravan Hardikar) यांनी आज रेडीरेकनेरचे दर (Ready Recker Rates in Maharashtra) जाहीर केले. राज्याच्या ग्रामीण भागात सरासरी 6.96 % तर प्रभाव क्षेत्रात 3.90 % नगरपालिका, नगरपंचायत 3.62% आणि महापालिका क्षेत्रात ( मुंबई वगळून) 8.80% इतकी वाढ करण्यात आली आहे. तसेच पुण्याबाबत मेट्रोकरता (Pune Metro) 1 टक्के अधिभार 1 एप्रिल 2022 पासून लागू करण्यात आला आहे, अशी माहिती श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे. पुण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. लागी करण्यात आलेल्या रेडीरेकनरच्या नव्या दरांमुळे आजा घर खरेदीचं स्वप्न आणखी महागण्याची शक्यता आहे. गेली दोन वर्ष राज्यातील रेडीरेकरचे दर वाढवण्यात आले नव्हते. मात्र आता या दरांमध्ये दोन वर्षांनी वाढ करण्यात आली आहे. याचा थेट परिणाम घरांच्या दरांवर जाणवणार आहे. मुंबई वगळता रेडी रेकनरचे दर हे लागू केले जाणार आहेत. 2022-23 वर्षासाठी हे नवे दर लागू होणार आहेत. आता मुंबई वगळता राज्यात इतर सर्वत्र घर खरेदी करणं कमालीचं महागेल, असं मत जाणकारांनी व्यक्त केलं आहे.

राज्यात ग्रामीण भागातील रेडीरेकनरच्या दरात सरासरी 6.96 टक्के वाढ करण्यात आली आहे. तर नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या क्षेत्रात 3.62 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. दरम्यान, महापालिका क्षेत्रात 8.80 टक्के इतकी वाढ करण्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

1 एप्रिलनं नवे दर लागू!

रेडीरेकनरचे दर वाढवण्याआधी घरांच्या रेजिस्ट्रेशन विभागानं आधीच जमिनीचं वार्षिक बाजारमूल्य हे वाढवण्याचा प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव मान्यही करण्यात आला होता. त्यानुसार ही वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, आता वाढ करण्यात आलेले रेडीरेकनरचे नवे दर हे नोंदणी आणि मुद्रांक विभागाकडूनही लागू करत त्याची तातडीनं अंमलबजावणी केली जाणार आहे.

रेडीरेकनरमध्ये कुठे किती सरासरी वाढ?

  1. ठाणे – 9.48%
  2. मीरा भाईंदर 8.30%
  3. कल्याण डोंबिवली 7.42%
  4. नवी मुंबई 8.90%
  5. उल्हासनगर 9.81%
  6. भिवंडी-निजामपूर 5.81%
  7. वसई विरार 9.00%
  8. पनवेल 9.24%
  9. पुणे 6.12%
  10. पुणे वाढीव हद्द 10.15
  11. पिंपरी चिंचवड 12.36%
  12. सांगली मिरज कुपवड 7.69%
  13. कोल्हापूर 6.45%
  14. सोलापूर 8.08%
  15. नाशिक 12.15%
  16. मालेगाव 13.12%
  17. धुळे 8.98%
  18. जळगाव 7.41%
  19. अहमदनगर 7.72%
  20. औरंगाबाद 12.38%
  21. नांदेड 8.99%
  22. लातूर 11.93%
  23. परभणी 9.60%
  24. नागपूर 3.29%
  25. चंद्रपूर 2.45%
  26. अमरावती 6.91%
  27. अकोला 5.05%

असा ठरवला जातो रेडी रेकनर दर

  1. शहरात वर्षभरात नोंदविण्यात आलेल्या खरेदी-विक्रीची व्यवहारांची माहिती राष्ट्रीय सूचना केंद्राकडून मागवली जाते.
  2. इंटरनेट आणि जाहिरातीतील बांधकामांचे दर आदी सर्व माहिती संकलित केले जातात.
  3. खरेदी-विक्री व्यवहारातील मालमत्तेचे स्थान, प्रकार, व्यवहारातील प्रत्यक्ष दर रेडी रेकनरचा दर, विकास क्षमता यासर्व बाबी विचारात घेऊन रेडी रेकनरचे दर निश्‍चित करण्यात येतात.
  4. वास्तुप्रदर्शन व विविध प्रकल्पांना भेटी, दस्तनोंदणी संबंधित संघटना, बांधकाम व्यावसायिकांच्या संघटना, व्यावसायिक यांच्यासह बैठका घेऊन सविस्तर चर्चा केली जाते.
  5. महसूल यंत्रणेकडून सूचना मागविल्या जातात. यासारगाळायचा रेडी रेकनरचे दर ठरविताना केला जातो.

इतर बातम्या :

1 एप्रिलला हलक्यात घेऊ नका! 1 एप्रिलपासून बजेट कोलमडण्याची दाट शक्यता, काय काय महागणार?

Petrol Prices: जगात जर्मनी भारतात परभणी, पेट्रोलचे सर्वात महाग पेट्रोल परभणीत का? वाचा सविस्तर

रशिया, युक्रेन युद्धाचा अर्थव्यवस्थेला फटका, पुढील वर्षी आर्थिक वृद्धी दर 7.6 टक्के राहण्याचा ‘इंडिया रेटिंग्स’चा अंदाज

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.