मोठी बातमी! महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान IPS विश्वास नांगरे पाटील यांना बढती, पदोन्नती नंतर ‘या’ विभागाचं कामकाज पाहणार

मुंबईच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची सुद्धा बदली करण्यात आली आहे.

मोठी बातमी! महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान IPS विश्वास नांगरे पाटील यांना बढती, पदोन्नती नंतर या विभागाचं कामकाज पाहणार
| Updated on: Dec 13, 2022 | 9:54 PM

कृष्णा सोनारवाडकर, मुंबई : राज्यातील बहुचर्चित आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या अखेर आज झाल्या आहेत. मुंबईच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची सुद्धा बदली करण्यात आली आहे. त्यांची ACB च्या अप्पर पोलीस महासंचालकपदी बदली करण्यात आलीय. खरंतर नांगरे पाटील यांना बढती आणि पदोन्नती मिळाल्याचं मानलं जातंय. दुसरीकडे पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनासुद्धा राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकपदी बढती देण्यात आलीय.

पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांचीदेखील बदली करण्यात आलीय. त्यांची नाशिक पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आलीय. तर त्यांच्या जागेवर विनयकुमार चौबे यांची पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलीय.

याशिवाय अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांची सुद्धा मुंबईत बदली करत त्यांना पदोन्नती देण्यात आलीय. तर मिलिंद भारंबे यांची नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलीय.

मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांचीसुद्धा बदली करत राज्याच्या दहशतवादी विरोधी पथकाच्या अप्पर पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलीय.

या सर्व बदल्या बहुचर्चित होत्या. कारण या बदल्या महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या आहेत.