AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेत्रीवर 127 किलो सोन्याच्या तस्करीचा आरोप, ईडीची मोठी कारवाई; IPS अधिकाऱ्याच्या सावत्र मुलीचा कारनामा

प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री रान्या रावच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. कारण ईडीने तिच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. 127 किलो सोन्याच्या तस्करीप्रकरणी रान्याला गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती.

अभिनेत्रीवर 127 किलो सोन्याच्या तस्करीचा आरोप, ईडीची मोठी कारवाई; IPS अधिकाऱ्याच्या सावत्र मुलीचा कारनामा
Ranya RaoImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 26, 2026 | 9:17 AM
Share

सोन्याच्या तस्करीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात बुधवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बेंगळुरूमध्ये कन्नड अभिनेत्री रान्या राव आणि इतर दोघांविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं आहे. रान्यासोबतच आरोपपत्रात तिचा सहकारी तरुण कोंडरु आणि बेल्लारी इथले सोन्याचे व्यापारी साहिल सकारिया जैन यांचंही नाव आहे. बेंगळुरूमधील पीएमएलए न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं. गेल्या वर्षी 3 मार्च रोजी महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईहून परतलेल्या रान्या उर्फ हर्षवर्धनी रान्याला अटक केली होती. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 32 वर्षीय रान्या रावकडून 14.2 किलो सोन्याचे बार जप्त करण्यात आले. त्यांची किंमत तब्बल 12.56 कोटी रुपये इतकी आहे.

तपासात असं दिसून आलं की मार्च 2024 ते मार्च 2025 या कालावधीत एकूण 127.28 किलो सोनं भारतात तस्करी करण्यात आल्याची माहिती ईडीने दिली आहे. या सोन्याची किंमत अंदाजे 102.55 कोटी रुपये आहे. तस्करीचं हे सोनं हँडलर आणि ज्वेलर्सच्या नेटवर्कद्वारे देशांतर्गत बाजारात विकलं गेल्याचा आरोप आहे. या विक्रीतून मिळालेले पैसे रोख स्वरुपात मिळाले आणि हवाला चॅनेलद्वारे भारतात आणि परदेशात हस्तांतरित करण्यात आले. त्यानंतर हा निधी अनेक बँक खाती आणि संस्थांद्वारे कायदेशीर व्यवसाय व्यवहार म्हणून दाखवण्यात आल्याचं एजन्सीने म्हटलंय.

परदेशातून सोनं खरेदी करणं, भारतात त्याची बेकायदेशीर आयात करणं, रोख रकमेसाठी त्याची विक्री करणं आणि हवाला, बँकिंग चॅनलद्वारे मिळालेल्या रकमेचं लाँडरिंग करणं हे सर्व संघटित आणि संरचित कृत्य असल्याचं आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान रान्या रावच्या मालकीच्या 34 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. दरम्यान दुबई सोनं तस्करी प्रकरणात अटकेत असलेल्या रान्या रावने जामिनाच्या सुनावणीदरम्यान कबूल केलं होतं की तिने सोनं खरेदी करण्यासाठी हवालाद्वारे पैसे ट्रान्सफर केले होते. रान्या राव ही वरिष्ठ आयपीएस अधिकारी रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी आहे. अधिकाऱ्यांनी असाही दावा केला आहे की ते त्यांच्या मुलीच्या संपर्कात नव्हते आणि तिच्या बेकायदेशीर कारवायांबद्दल त्यांना माहिती नव्हती.

रान्या राव एका वर्षात 30 वेळा तस्करीसाठी दुबईला गेली होती. एक किलो सोन्याची तस्करी करण्यासाठी तिला एक लाख रुपये मिळात होते. दुबईला गेल्यावर तिला जवळपास 13 लाख रुपये मिळात होते. तिने स्मगलिंगसाठी मॉडिफाईड जॅकेट आणि स्पेशल बेल्टचा वापर केला.

Follow Us
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास...
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास....
प्रहारचा आवाज ठाम; एकनाथ शिंदेंचा पाईक होईन पण तडजोड नाही....
प्रहारचा आवाज ठाम; एकनाथ शिंदेंचा पाईक होईन पण तडजोड नाही.....
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! पश्चिम बंगालमध्ये मतदान केंद्रावरील CCTV
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! पश्चिम बंगालमध्ये मतदान केंद्रावरील CCTV.
नाशिक, परतवाड्यानंतर अकोल्यातही लव्ह जिहाद? आधी अपहण नंतर 5 दिवस... प
नाशिक, परतवाड्यानंतर अकोल्यातही लव्ह जिहाद? आधी अपहण नंतर 5 दिवस... प.
99 टक्के ठाकरेच उमेदवार, पण...बॉस इज ऑल्वेज राईट म्हणत नार्वेकरांचे...
99 टक्के ठाकरेच उमेदवार, पण...बॉस इज ऑल्वेज राईट म्हणत नार्वेकरांचे....
सुनेत्रा पवारच विधानपरिषदेसाठी उमेदवार जाहीर करणार? संध्याकाळीच...
सुनेत्रा पवारच विधानपरिषदेसाठी उमेदवार जाहीर करणार? संध्याकाळीच....
मोठी बातमी! बापरे...राज्यात उष्माघाताचा धोका वाढला; तापमान वाढीसोबत...
मोठी बातमी! बापरे...राज्यात उष्माघाताचा धोका वाढला; तापमान वाढीसोबत....
शब्दाचा पक्का माणूस' विलिनीकरणाच्या चर्चेतच बच्चू कडूंचं मोठं विधान
शब्दाचा पक्का माणूस' विलिनीकरणाच्या चर्चेतच बच्चू कडूंचं मोठं विधान.
चक्क 'अरे सोड रे...' म्हणत राऊतांनी पत्रकाराचा 'तो' प्रश्न धुडकावला
चक्क 'अरे सोड रे...' म्हणत राऊतांनी पत्रकाराचा 'तो' प्रश्न धुडकावला.
मस्साजोग ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मोठा उलटफेर, अश्विनी देशमुख....
मस्साजोग ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मोठा उलटफेर, अश्विनी देशमुख.....