AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे गटाचे धक्कातंत्र, उद्धव ठाकरे नव्हे तर या नेत्याला विधानपरिषदेची उमेदवारी, ऐनवेळी मोठी घोषणा!

राज्यातील विधानसभा निवडणुकीबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे हे विधानपरिषदेवर जाणार असल्याचे बोलले जात होते, मात्र आता उद्धव ठाकरे यांच्याऐवजी अंबादास दानवे यांना महाविकास आघाडीचे तिकीट देण्यात आले आहे. आदित्य ठाकरे यांनी ही घोषणा केली आहे.

ठाकरे गटाचे धक्कातंत्र, उद्धव ठाकरे नव्हे तर या नेत्याला विधानपरिषदेची उमेदवारी, ऐनवेळी मोठी घोषणा!
Uddhav ThackerayImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Apr 29, 2026 | 3:57 PM
Share

राज्यातील विधानपरिषद निवडणुकीबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे हे विधानपरिषदेवर जाणार असल्याचे बोलले जात होते, मात्र आता उद्धव ठाकरे यांच्याऐवजी अंबादास दानवे यांना महाविकास आघाडीचे तिकीट देण्यात आले आहे. आदित्य ठाकरे यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे आता काँग्रेसला हा निर्णय मान्य आहे का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अंबादास दानवे विधान परिषदेवर जाणार

गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील अशी चर्चा रंगली होती, मात्र उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी नको असल्याच्याही बातम्या समोर येत होत्या. आज अखेर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरे हे विधान परिषदेवर जाणार नसल्याची माहिती देत अंबादास दानवे हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील अशी माहिती दिली आहे. या आधीही दानवे यांनी विधान परिषदेत विरोधी पक्षनेता म्हणून काम पाहिलेले आहे.

संजय राऊतांनीही दिली माहिती

अंबादास दानवे यांच्या उमेदवारीच्या घोषणेबाबत संजय राऊत यांनी ट्विट केले आहे. राऊत यांनी म्हटले की, अंबादास दानवे हे शिवसेनेचे म्हणजेच महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे उमेदवार असतील. उद्या 11 वाजता ते उमेदवारी अर्ज दाखल करतील, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दानवे यांच्या नावाची घोषणा केली.

काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

याआधी काँग्रेसने उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारीला आमचा पाठिंबा असल्याची माहिती दिली होती. मात्र आता उद्धव ठाकऐवजी अंबादास दानवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता काँग्रेस काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आता या निवडणुकीत काँग्रेसकडूनही उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे.

भाजपाकडूनही उमेदवारांची यादी जाहीर

भाजपाकडून उमेदवारी मिळावी यासाठी राज्यातील बऱ्याच बड्या नेत्यांकडून प्रयत्न केले जात होते. वरिष्ठांच्या भेटीगाठी घेतल्या जात होत्या. परंतु भाजपाने नेहमीप्रमाणे धक्कातंत्राचा वापर करत नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. भाजपाने यावेळी माधवी नाईक, सुनिल कर्जतकर, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार यांना विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. तर विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा