AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! बापरे...राज्यात उष्माघाताचा धोका वाढला; तापमान वाढीसोबत पाणीटंचाईचीही झळ

मोठी बातमी! बापरे…राज्यात उष्माघाताचा धोका वाढला; तापमान वाढीसोबत पाणीटंचाईचीही झळ

| Updated on: Apr 29, 2026 | 1:10 PM
Share

राज्यात वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका वाढला असून, आरोग्य विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. 1 मार्च 2026 ते 20 एप्रिलदरम्यान राज्यभरात उष्माघाताचे तीन रुग्ण आढळले असून, अकोला, नंदुरबार आणि रत्नागिरी जिल्ह्यांत सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

दरम्यान, गोंदिया जिल्ह्यात उष्णतेने कहर केला असून तापमानाचा पारा 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, महिला रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये विशेष उष्माघात कक्ष (Heat Stroke Units) सुरू केले आहेत, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना त्वरित उपचार मिळू शकतील.
दुसरीकडे, नाशिक जिल्ह्यातील काही भागांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील 40 गावं आणि 87 पाड्यांना सध्या 44 टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. पाण्याची टंचाई लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. एकूणच, राज्यात उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

Published on: Apr 29, 2026 01:10 PM
Follow Us