AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! अमेरिका इराणसोबत भांडणात गुंतलेली असतानाच भारताच्या शेजारी देशात थेट अणू क्रांती, रशियाचा मोठा खेळ

एकीकडे इराण अण्विक शस्त्र बनवत आहे, असा आरोप करून अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर हल्ला करण्यात आला. सध्या या तीनही देशांमध्ये युद्धविराम झाला आहे. मात्र आता आशिया खंडातून मोठी बातमी समोर येत आहे.

मोठी बातमी! अमेरिका इराणसोबत भांडणात गुंतलेली असतानाच भारताच्या शेजारी देशात थेट अणू क्रांती, रशियाचा मोठा खेळ
nuclear plantImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 29, 2026 | 3:11 PM
Share

एकीकडे इराण अमेरिका आणि इस्त्रायल युद्धात गुतंलेले आहेत. अमेरिका आणि इराणमध्ये जरी युद्धविराम झाला असला तरी देखील मध्य पूर्वेतील तणाव अजूनही काही कमी झालेला नाही, स्ट्रेट ऑफ होर्मूज व्यापारी जहाजाच्या वाहतुकीसाठी बंद आहे. स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद असल्यामुळे संपूर्ण जगावर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. स्ट्रेट ऑफ होर्मूज पुन्हा कधी सुरू होणार? याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. इराण अण्वस्त्रांची निर्मिती करतो, असा अमेरिकेला संशय असल्यामुळे अमेरिका आणि इस्त्रायलने 28 फेब्रुवारी रोजी इराणवर हल्ला केला होता, या युद्धामध्ये इराण पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. तर दुसरीकडे इराणच्या हल्ल्यांमध्ये देखील अमेरिका आणि इस्त्रायलचं प्रचंड नुकसान झालं. हे युद्ध सुरू असतानाच आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

बांगलादेशने मंगळवारी अणु ऊर्जा उत्पादन क्षेत्रात आपलं पहिलं पाऊल टाकलं आहे. मंगळवारपासून बांगलादेशमधील रुपपूर येथील अणूऊर्जा प्रकल्पातील VVER-1200 अणुभट्टीमध्ये इंधन भरण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी बांगलादेशने रशियाची मदत घेतली आहे. हे रशियाचं अद्ययावत ‘प्रेशराइज्ड वॉटर रिअॅक्टर’ तंत्रज्ञान असून, भारत देखील आपल्या भविष्यातील अणु ऊर्जा प्रकल्पांसाठी विशेषतः कुडनकुलम येथील प्रकल्पासाठी या तंत्रज्ञानाचा विचार करत आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार बांगलादेशची राजधानी ढाकापासून या अणु ऊर्जा प्रकल्पाचं अंतर 160 किलोमीटर एवढं आहे. बांगलादेशने अणु ऊर्जा उत्पादन क्षेत्रात आता आपलं पहिलं पाऊल टाकलं आहे. रशियाच्या मदतीने त्यांनी हा प्रकल्प सुरू केला आहे. मंगळवारपासून अणुभट्टीमध्ये इंधन भरण्यास देखील सुरुवात झाली आहे. 2.4 गीगा व्हॅट एवढी या संयंत्राची क्षमता आहे. यामुळे देशाला जेवढ्या ऊर्जेची गरज आहे, त्यातील 10-12 टक्के ऊर्जेची गरज यातून पूर्ण होणार आहे. बांग्लादेश या अणु ऊर्जेचा वापर हा वीज निर्मिती करण्यासाठी करणार आहे, यातून कोणत्याही प्रकारची शस्त्रास्त्र विकसीत केली जाणार नाहीयेत. 2027 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं सुरू होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Follow Us
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक