AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोटातच झाला गर्भाचा सांगाडा! 3 वर्ष महिलेला काही कळलंच नाही, तिव्र वेदना सुरु होताच समोर आलं धक्कादायक सत्य

पोटातच बाळातं दगड झालं.. हे ऐकल्यानंतर तुम्हाला देखील नवल वाटेल. पण महिलेला कळलंच नाही की, ती गरोदर आहे, अखेर पोटात तिव्र वेदना सुरु झाल्यानंतर पोटातच बाळाचं दगड झाल्याचं समोर आलं... जाणून घ्या नेमकं झालं तरी काय...

पोटातच झाला गर्भाचा सांगाडा! 3 वर्ष महिलेला काही कळलंच नाही, तिव्र वेदना सुरु होताच समोर आलं धक्कादायक सत्य
फाईल फोटो
| Updated on: Oct 30, 2026 | 1:04 PM
Share

आई होण्याचा प्रवास प्रत्येक महिलेसाठी खास असतो. कारण तिच्यामध्ये एक नवीन जीव वाढत असतं… पण विचार करा जर, एक महिला गरोदर आहे आणि काही अंतर्गत शारीरित व्याधींमुळे तिच्या बाळाचं पोटातच निधन झालं तर… ही एका स्त्रीसाठी फार दुःखद घटना असते. एवढंच नाही तर, गर्भातून बाळ येण्याऐवजी कॅल्शियम एकत्र होऊन दगड बाहेर आलं तर… समोर आलेल्या माहितीनुसार, सोमालीलँडमध्ये एक अत्यंत दुर्मिळ प्रकरण समोर आलं आहे, जिथे 42 वर्षीय महिलेच्या पोटातून सुमारे तीन वर्षांनंतर एक ‘दगडी बाळ’ (स्टोन बेबी) बाहेर काढण्यात आलं.

सोमालीलँडमध्ये राहणाऱ्या महिलेला पोटाच्या खालच्या भागात वेदना होत होत्या. पण तिला त्या वेदना तिला कळून आल्याच नाहीत. साधं दुखणं असल्याचं समजत महिलेने त्याककडे दुर्लक्ष केलं. पण जेव्हा वेदना तिव्र झाल्या आणि महिला डॉक्टरांकडे गेली, तेव्हा डॉक्टरांनी अल्ट्रासाउंड आणि सीटी स्कॅन केल्यानंतर डॉक्टर देखील हैराण झाले.

महिलेच्या पोटात एक गर्भाचा सांगाडा असल्याचं समोर आलं. जो कॅल्शियम पूर्णपणे साचल्यामुळे दगडासारखं कडक झालं होतं. ‘इंटरनॅशनल मेडिकल केस रिपोर्ट्स जर्नल’मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासाचा हवाला देत ‘लाइव्ह सायन्स’ने ही माहिती दिली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘या स्थितीला ‘लिथोपेडियन’ किंवा ‘स्टोन बेबी’ असं देखील म्हणतात. अशी परिस्थिती तेव्हा निर्माण होते जेव्हा, गर्भाशयात वाढणारं गर्भ पोटात वाढू लागतं आणि याचं कारणांमुळे बाळाचं गर्भातच निधन होतं.’

जेव्हा गर्भ खूप मोठा होतो, तेव्हा शरीर त्याचं पुनर्शोषण करू शकत नाही. स्वतःचं रक्षण करण्यासाठी, शरीर मृत गर्भाभोवती कॅल्शियमचा थर साचवू लागते. कालांतराने, तो गर्भ दगडासारखा कठीण बनतो. गेल्या 400 वर्षांत, जगभरात अशा प्रकारची केवळ 330 ते 340 प्रकरणं नोंदवली गेली आहेत.

डॉक्टरांनी वाचवले महिलेचे प्राण…

महिलेची प्रकृती लक्षात घेत, डॉक्टरांनी तात्काळ ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. कठीण ऑपरेशननंतर डॉक्टरांनी महिलेच्या पोटातून दगड झालेल्या गर्भाला सुरक्षित बाहेर काढलं. ऑपरेशननंतर महिलेच्या प्रकृतीत सुधारना होत असून, तिला रुग्णालयातून घरी देखील सोडण्यात आलं आहे. 6 महिने पूर्ण तपासणी केल्यानंतर महिलेची प्रकृती आता स्थिर असून, तिच्या वेदना नष्ट झाल्यात… तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, ग्रामीण आणि मागास भागांत, वेळेवर सोनोग्राफी आणि वैद्यकीय उपचार उपलब्ध नसल्यामुळे, अशा प्रकारची प्रकरणं अनेकदा दीर्घकाळपर्यंत लक्षात येत नाहीत.

Follow Us
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
महायुती टिकवायची असेल तर...; भाजपचा मित्रपक्षाला इशारा
BJP Vs Shivsena : महायुती टिकवायची असेल तर झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई करा; भाजपचा मित्रपक्षाला इशारा...
माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये; नवनाथ बन यांनी कोणाला सुनावलं
Navnath Ban : 12 पक्ष बदलले नाही...माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये...; नवनाथ बन यांचा रवींद्र धंगेकरांवर घणाघात
ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
Shivsena : ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला?....
Vijay Wadettiwar : ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? रवींद्र धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला तो त्यांनी सांगावा...
प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार....
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार; संजय राऊत असं का म्हणाले?
महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
Sanjay Raut : वैचारिक मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
Matheran Mini Train : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
मुंबईत अचानक पावसाची हजेरी, ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर रिमझिम सरी...
Mumbai Rain Updates : मुंबईत अचानक पावसाची हजेरी, ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर रिमझिम सरी; वातावरणात गारवा
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले