AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ladki Bahin : लाडक्या बहि‍णींसाठी दिवाळी गिफ्ट, केवायसी न झालेल्या 81 लाख महिलांना 1500 रुपये? फडणवीस म्हणाले काय?

Ladki Bahin Yojana Installment : राज्यातील 81 लाख लाडक्या बहि‍णींना दिवाळी गिफ्ट मिळू शकते. केवायसी प्रक्रिया पूर्ण न केलेल्या महिलांना लवकरच 1500 रुपयांचा सन्माननिधी मिळू शकतो. काय दिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन?

Ladki Bahin : लाडक्या बहि‍णींसाठी दिवाळी गिफ्ट, केवायसी न झालेल्या 81 लाख महिलांना 1500 रुपये? फडणवीस म्हणाले काय?
लाडक्या बहि‍णींसाठी दिवाळी गिफ्ट, केवायसी न झालेल्या 81 लाख महिलांना 1500 रुपये? फडणवीस म्हणाले काय?
| Updated on: Oct 30, 2026 | 12:38 PM
Share

Devendra Fadnavis on Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट समोर येत आहे. राज्यातील 81 लाख लाडक्या बहि‍णींना दिवाळी गिफ्ट मिळू शकते. काही कारणास्तव त्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. यामध्ये आदिवासी आणि गरीब कुटुंबातील महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. या महिलांना लवकरच 1500 रुपयांचा सन्माननिधी मिळू शकतो. या महिलांना 1500 रुपयांचा हप्ता मिळवून देण्याची हमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर कष्टकरी, शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना फडणवीस यांनी हे आश्वासन दिल्याची माहिती समोर येत आहे.

किसान सभेने बैठकीत मांडला महत्त्वाचा मुद्दा

अखिल भारतीय किसान सभेने कष्टकरी, शेतकरी यांचा न्याय मागण्यासाठी मोर्चा काढला. हा मोर्चा मुंबईकडे निघाला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाला भेटीस बोलावले होते. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर शिष्टमंडळासोबत साधकबाधक चर्चा झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि पाच महत्त्वाच्या खात्याचे मंत्री हजर होते. तसेच विविध विभागाचे सचिवही उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या अडीअडचणीसोबतच किसान सभेने लाडक्या बहि‍णींचा मुद्दा उपस्थित केला. राज्यातील अनेक महिलांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता न आल्याचा मुद्दा हिरारीने मांडला. तांत्रिक अडचणी समोर आणल्या.

मुख्यमंत्र्यांचे मोठे आश्वासन

शिष्टमंडळाशी चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी ई-केवायसी रखडलेल्या, प्रलंबित महिलांना दिलासा दिला. कागदपत्रांची पूर्तता केली नाही अथवा ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही अशा सर्व पात्र महिलांच्या बँका खात्यात पैसे जमा करण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले. जवळपास 81 लाख महिलांची तांत्रिक अडचण दूर करण्यात येईल अशी हमी मुख्यमंत्र्यांनी दिली. यामुळे या महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रशासनाला तातडीने याप्रकरणी अंमलबजावणीचे निर्देशही देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

पोर्टल लवकरच सुरू होणार

केवायसी अभावी आर्थिक लाभापासून वंचित 81 लाख लाडक्या बहि‍णींना पुन्हा योजनेत समावून घेण्यात येणार आहे. केवायसी प्रक्रिया सुरू ठेवण्यात येणार आहे. सध्या बंद असलेले पोर्टल पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. ज्या लाडक्या बहि‍णींची केवायसी प्रक्रिया झालेली नाही. अथवा ज्यांची केवायसी प्रक्रिया होऊनही त्यांना सन्माननिधी मिळत नसेल. त्यांना तो लगेच मिळण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे.

Follow Us
महायुती टिकवायची असेल तर...; भाजपचा मित्रपक्षाला इशारा
BJP Vs Shivsena : महायुती टिकवायची असेल तर झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई करा; भाजपचा मित्रपक्षाला इशारा...
माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये; नवनाथ बन यांनी कोणाला सुनावलं
Navnath Ban : 12 पक्ष बदलले नाही...माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये...; नवनाथ बन यांचा रवींद्र धंगेकरांवर घणाघात
ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
Shivsena : ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला?....
Vijay Wadettiwar : ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? रवींद्र धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला तो त्यांनी सांगावा...
प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार....
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार; संजय राऊत असं का म्हणाले?
महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
Sanjay Raut : वैचारिक मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
Matheran Mini Train : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
मुंबईत अचानक पावसाची हजेरी, ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर रिमझिम सरी...
Mumbai Rain Updates : मुंबईत अचानक पावसाची हजेरी, ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर रिमझिम सरी; वातावरणात गारवा
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?