IND vs NZ : इतकं चांगलं खेळून पण..शेवटी वैभव सूर्यवंशीबाबत चौथ्या सामन्यात जी भिती होती तेच घडलं
IND vs NZ 4th T20 : टीम इंडिया सध्या न्यूझीलंड दौऱ्यात टी20 सीरीजमध्ये जबरदस्त प्रदर्शन करत आहे. सीरीजमध्ये आधीच टीम इंडियाने 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आज चौथा टी20 सामना सुरु आहे.

टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये पाच टी20 सामन्यांच्या सीरीजमधला आज चौथा सामना आहे. ऑकलंडच्या ईडन पार्कवर ही मॅच सुरु आहे. टीम इंडियाचा कॅप्टन श्रेयस अय्यरने टॉस जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय टीम मध्ये दोन बदल करण्यात आले आहेत. त्यातला एक निर्णय वादग्रस्त ठरणारा आहेत. त्यावर भरपूर चर्चा होईल. कारण ओपनर वैभव सूर्यवंशीने परफॉर्म करुनही त्याला प्लेइंग इलेवनमधून ड्रॉप करण्यात आलय. त्याशिवाय एका गोलंदाजाचा पत्ताही टीममधून कट झाला आहे. ओपनर वैभव सूर्यवंशीशिवाय भुवनेश्वर कुमारला सुद्धा चौथ्या टी20 सामन्यातून ड्रॉप करण्यात आलं. त्याची माहिती स्वत: कॅप्टन श्रेयस अय्यरने टॉस नंतर दिली. वैभव सूर्यवंशीच्या जागी इशान किशनच टीममध्ये कमबॅक झालय. भुवनेश्वर कुमारच्या जागी मयंक यादव खेळतोय. गोलंदाजीच्या बाबतीत हा रणनितीक बदल आहे. त्याशिवाय भुवनेश्वर कुमारला बाहेर बसवण्यामागे परफॉर्मन्स हे सुद्धा एक कारण आहे. तीन सामन्यात भुवनेश्वर कुमारने फक्त एक विकेट काढला. तो महागडा गोलंदाज सुद्धा ठरला.
वैभव सूर्यवंशीबद्दल बोलायचं झाल्यास तिसऱ्या टी20 सामन्यात त्याने 19 चेंडूत 45 धावा फटकावलेल्या. अभिषेक शर्मासोबत मिळून त्याने 2.2 ओव्हरमध्ये 50 धावा आणि पाच ओव्हरमध्ये 100 रन्स करुन रेकॉर्ड बनवलेला. पावरप्लेमध्ये दोघांनी 118 धावा केलेल्या. मात्र, तरीही त्याला ड्रॉप केलं. कारण ईशान किशन नंबर तीनच्या पोजिशनवर खेळतो. दुखापतीमुळे तो दोन मॅच बाहेर होता. तो टीममध्ये आल्यानंतर आता वैभव बाहेर गेलाय.
तो खास काही कमाल दाखवू शकला नाही
भुवनेश्वर कुमारने कमबॅक जरुर केलं. पण तो खास काही कमाल दाखवू शकला नाही. तीन सामन्यात त्याने 12 ओव्हर टाकल्या. 139 धावा दिल्या. कुठल्याही अन्य गोलंदाजापेक्षा या जास्त धावा आहेत. त्याला विकेटही मिळाला नाही. ऑकलंडच्या पीच बद्दल बोलायच झाल्यास तिथे गवत आहे. मध्यम गती गोलंदाजासाठी तिथे बॉलिंग करणं कठीण आहे. कारण 140, 150 च्या स्पीडने गोलंदाजी करणाऱ्या मयंकचा प्लेइंग इलेवनमध्ये समावेश झालाय.
टीम इंडियाची प्लेइंग इलेवन
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेट किपर), ईशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, नीतीश कुमार रेड्डी, नमन धीर, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, मयंक यादव आणि प्रिंस यादव
