Vidhan Parishad Election 2026 | 99 टक्के ठाकरेच उमेदवार, पण… बॉस इज ऑल्वेज राईट म्हणत नार्वेकरांचे संकेत काय?
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून उमेदवार कोण असणार, याबाबतचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर यांनी “99 टक्के उमेदवार उद्धव ठाकरेच असतील,” असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. मात्र, “1टक्का सांगता येत नाही, पण बॉस इज ऑल्वेज राईट,” असे म्हणत त्यांनी अंतिम निर्णय नेतृत्वावर अवलंबून असल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, या विषयावर खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया देताना सूचक विधान केले आहे. “आमचा एकच उमेदवार आहे, सगळ्यांचा मिळून,” असे सांगत त्यांनी इतर पक्षांनी यादी जाहीर केल्याचा उल्लेख केला. “उद्या अर्ज भरण्याचा दिवस आहे. सकाळी 11 वाजता नेमकं कोण अर्ज भरणार ते कळेल,” असे राऊत म्हणाले. तसेच, “विधान भवनाच्या पायऱ्यांवर गेल्यावरच उमेदवाराचं नाव स्पष्ट होईल,” असे म्हणत त्यांनी उमेदवाराच्या नावाबाबत अधिकृत घोषणा टाळली. त्यामुळे महाविकास आघाडीकडून उद्या अर्ज कोण भरणार, उद्धव ठाकरे की अन्य कोण, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Published on: Apr 29, 2026 01:44 PM
काळाचा घाला! 15 प्रवाशांची कार विहिरीत; अन् पुढे जे झालं.....
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण...
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये...
'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर CM