AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

tv9 Marathi Special Report | Rohit Pawar | अजित पवार विमान अपघात प्रकरण तापले; DGCA विरोधात गुन्हा दाखल करण्यावरून रोहित पवार–पोलिसांत बाचाबाची

tv9 Marathi Special Report | Rohit Pawar | अजित पवार विमान अपघात प्रकरण तापले; DGCA विरोधात गुन्हा दाखल करण्यावरून रोहित पवार–पोलिसांत बाचाबाची

| Updated on: Feb 26, 2026 | 9:02 AM
Share

दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी नव्या घडामोडींना वेग आला आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोप करत मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन येथे धाव घेतली. रोहित पवार यांनी या प्रकरणात तक्रार दाखल केली होती.

दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी नव्या घडामोडींना वेग आला आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोप करत मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन येथे धाव घेतली. रोहित पवार यांनी या प्रकरणात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर DGCA यांनी संबंधित VSR कंपनीच्या कामकाजावर ठपका ठेवत अनेक त्रुटी निदर्शनास आणल्या. तसेच चार मॉडेलच्या विमानांवर तात्काळ बंदी घालण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी DGCA आणि VSR कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र, पोलिसांनी DGCA विरोधात गुन्हा नोंदवण्यास नकार दिल्याने वातावरण तणावपूर्ण झाले. याच कारणावरून पोलीस ठाण्यात रोहित पवार आणि DCP प्रवीण मुंडे यांच्यात बाचाबाची झाली. दरम्यान, “DGCA ने स्वतःच विमान कंपनीच्या त्रुटी स्पष्ट केल्या आहेत आणि संबंधित चार मॉडेलच्या विमानांवर बंदीही घातली आहे. मग एवढं सगळं समोर असताना गुन्हा का दाखल केला जात नाही?” असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Feb 26, 2026 09:02 AM

Follow Us
सरकारची मोठी घोषणा! नीट परीक्षा पेपरफुटीत थेट निर्णय, नरेंद्र मोदी यांनी...

सरकारची मोठी घोषणा! नीट परीक्षा पेपरफुटीत थेट निर्णय, नरेंद्र मोदी यांनी..

Gold Rate Today: सोन्याने पुन्हा घेतली भरारी ! किती महागलं सोनं-चांदी ? आज 1 तोळा सोन्याचे दर...

Gold Rate Today: सोन्याने पुन्हा घेतली भरारी ! किती महागलं सोनं-चांदी ? आज 1 तोळा सोन्याचे दर..

मुलांची डोकी फुटताना बघून आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर..; समीर चौघुलेंकडून तीव्र संताप व्यक्त.

मुलांची डोकी फुटताना बघून आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर..; समीर चौघुलेंकडून तीव्र संताप व्यक्त

CJP Protest: प्रत्येक मुलाला, विद्यार्थ्याला… युवराज सिंगकडून संताप व्यक्त, आंदोलनाबाबत स्पष्टच बोलला.

CJP Protest: प्रत्येक मुलाला, विद्यार्थ्याला… युवराज सिंगकडून संताप व्यक्त, आंदोलनाबाबत स्पष्टच बोलला

जंतरमंतरवरच यावं लागेल… त्यांच्या घरी जाऊन वेळ वाया घालवणार नाही; आशुतोष रांका आक्रमक.

जंतरमंतरवरच यावं लागेल… त्यांच्या घरी जाऊन वेळ वाया घालवणार नाही; आशुतोष रांका आक्रमक

पोलीस आंदोलकांना वॅन मध्ये भरुन घेऊन जात होते, पण एकाने गेट उघडला आणि..व्हिडिओ तुफान व्हायरल, चेंबूरमधील घटना.

पोलीस आंदोलकांना वॅन मध्ये भरुन घेऊन जात होते, पण एकाने गेट उघडला आणि..व्हिडिओ तुफान व्हायरल, चेंबूरमधील घटना