Teacher-Graduate Election: 182 उमेदवारांचं भविष्य 10 लाख मतदारांच्या हाती, शिक्षक, पदवीधर मतदारसंघांमध्ये आज मतदान, चुरशीत कोण बाजी मारणार?
Maharashtra Teacher and Graduate Constituency Election : आज विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी 182 उमेदवारांचं भविष्य मतपेटीत बंद होणार आहे. नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर(मराठवाडा), पुणे या मतदारसंघात जोरदार चुरस दिसली. आज मतदान प्रक्रिया होत आहे.

Maharashtra Teacher and Graduate Constituency Election : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. 182 उमेदवारांचं भविष्य आज मतपेटीत बंद होणार आहे. नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर(मराठवाडा), पुणे या मतदारसंघात जोरदार चुरस दिसली. अनेक ठिकाणी बंडखोरांनी आणि अपक्षांनी मोठे आव्हान उभे केले आहे. तर काही प्रस्थापितांच्या सत्तेला सुरूंग लागण्याची भीती व्यक्त होत आहे. त्याचवेळी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे.
आज शिक्षक- पदवीधर मतदारसंघासाठी मतदान
आज शुक्रवारी, 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजेपासून मतदानाला सुरूवात होईल. तर सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. सर्व उपविभागीय अधिकारी स्तरावरून मतदान पथकांना निवडणुकीसाठी आवश्यक साहित्य देण्यात आले आहे. सर्व पात्र पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी मतपात्रिका वैध ठरावी, या उद्देशाने निवडणूक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हा आवश्यक पुरावा
आधार कार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड, भारतीय पासपोर्ट, राज्य अथवा केंद्र सरकार, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्था अथवा खासगी औद्योगिक संस्थांद्वारे त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिलेले सेवा ओळखपत्र, खासदार, आमदार, विधान परिषद सदस्य यांना दिलेली अधिकृत ओळखपत्रे, संबंधित शिक्षक, पदवीधर मतदारसंघातील मतदार, शैक्षणिक संस्थांनी जारी केलेले सेवा ओळखपत्र, विद्यापीठ वितरीत मूळ पदवी, पदविका प्रमाणपत्र
पाच मतदारसंघात मतदान
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर मराठवाडा पदवीधर तर पुणे आणि अमरावती शिक्षक अशा पाच मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे. पाचपैकी पुणे पदवीधर मतदारसंघांत सर्वाधिक 3 लाख 88 हजार मतदार आहेत. सर्वात कमी 35 हजार मतदार हे अमरावती शिक्षक मतदारसंघात आहेत. या निवडणुकीसाठी पाचही मतदारसंघात 2,419 मतदान केंद्रं उभारण्यात आली आहेत. 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल.
निवडणुकीत चुरशीचा सामना
पुणे पदवीधर मतदारसंघ
स्मिता जाधव- भाजप
हर्षदा देशमुख-राष्ट्रवादी (शरद पवार)
पुणे शिक्षक मतदारसंघ मराठवाडा
कौस्तुभ गावडे-भाजप
सचिन सानप- शिवसेना शिंदे
जयंत आसगावकर-काँग्रेस
नागपूर पदवीधर मतदारसंघ
सुधाकर कोहळे-भाजप
अभिजीत वंजारी-काँग्रेस
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ
सतीश चव्हाण- राष्ट्रवादी (अजित पवार)
प्रतापसिंह पाटील- राष्ट्रवादी (शरद पवार)
दिलीप घुगे- शिवसेना (ठाकरे)
अमरावती शिक्षक मतदारसंघ
किरण सरनाईक– शिवसेना (शिंदे)
आदिती पोहरे- काँग्रेस