मुंबईत मोदी यांची सुरक्षा भेदली, बनावट NSG जवानासह दोघांना अटक, एकाकडे घातक शस्त्र

मुंबईतील बीकेसी एमएमआरडीए मैदानावर 19 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची (PM Modi) जाहीर सभा झाली. या परिसरातून मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यातील एक जण NSG जवान असल्याचे सांगत मोदींच्या सभेत VVIP क्षेत्रात घुसला. एकाकडे घातक शस्त्रात्रे मिळाली आहे.

मुंबईत मोदी यांची सुरक्षा भेदली, बनावट NSG जवानासह दोघांना अटक, एकाकडे घातक शस्त्र
PM narendra modi, CM Eknath Shinde, Deputy CM Devendra Fadanvis
Image Credit source: Social Media
| Updated on: Jan 21, 2023 | 1:24 PM

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची १९ जानेवारी रोजी मुंबईत सभा झाली. मोदी यांच्या या दौऱ्या दरम्यानची एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबईतील बीकेसी एमएमआरडीए मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची (PM Modi) जाहीर होती. या परिसरातून मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यातील एक जण NSG जवान असल्याचे सांगत मोदींच्या सभेत VVIP क्षेत्रात घुसला होता. अटक केलेल्या  एका व्यक्तीकडे घातक शस्त्र आढळल्याने खळबळ उडाली आहे. कटराम चंद्रगाई कावड व रामेश्वर मिश्रा असं या आरोपीचं नाव आहे. कटराम हा हॉटेल आणि ट्रान्सपोर्टचा कर्मचारी असून तो भिवंडी येथील रहिवासी असल्याचं तपासात समोर आलं आहे.

पोलिसांना आला संशय

मोदींच्या सभास्थळी गस्त घालणाऱ्या कटराम कावड (वय ३९) याच्यावर पोलिसांना संशय आला. त्यावेळी त्याला थांबवून त्याची चौकशी केली. पोलिसांना त्याच्याकडे स्मिथ अँड वॅगन स्प्रिगफिल्ड रिव्हॉल्व्हरसह चार राऊंड सापडले. त्याच्याकडे या रिव्हॉल्व्हरचा परवाना आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो भिवंडी येथील राहणार आहे.

बनावट NSG जवान

पोलिसांनी सभा स्थळावरुन आणखी एका व्यक्तीला अटक केली. तो NSG जवान असल्याचे सांगत होता. रामेश्वर मिश्रा नावाच्या हा व्यक्ती मोदी सभास्थळी पोहचण्याच्या ९० मिनिटांपुर्वी आला होता. NSG तो नायक पदावर असल्याचा दावा करत होता. तो अत्याधुनिक सुरक्षा असणाऱ्या व्हिव्हिआयपी परिसरात घुसण्याचा प्रयत्न करत होता. मुंबई पोलिसांना त्यांच्यावर संशल आला. त्यानंतर त्याची चौकशी सुरु केली. मुंबई क्राइम ब्रँचच्या (Mumbai Crime Branch) अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. सुरक्षित क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी तो इकडे तिकडे फिरत असल्याने गुन्हे शाखेने त्याच्यावर अर्धा तास नजर ठेवली होती. त्याच्याकडे १३ जानेवारीला जारी केलेले बनावट ओळखपत्र मिळाले. परंतु ओळखपत्राच्या रिबिनवर दिल्ली पोलिस लिहिले आहे.

वांद्रे न्यायालयाने दिली कोठडी

पोलिस चौकशीदरम्यान, आरोपी दावा करत होता की तो एनएसजीच्या पठाणकोट हबमध्ये पोस्टिंगवर आहे. मात्र मुंबई पोलिसांनी तपास केला असता त्याचा आयडी बनावट असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी मिश्राविरुद्ध भादंवि कलम १७१, ४६५, ४६८ आणि ४७१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला शुक्रवारी वांद्रे न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 24 तासांची पोलीस कोठडी सुनावली.