AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीपी वाढला अन् मृत्यू झाला, पण अचानक महिलेने उघडले डोळे; खड्ड्यामुळे थक्क करणारा चमत्कार; नेमकं काय घडलं?

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांच्या बातम्या मुंबई, दिल्ली, बेंगळुरू आणि इतर शहरांमध्ये नेहमीच येतात. पण उत्तर प्रदेशातील पीलीभीत येथून एक अशी बातमी आली आहे ज्यात खड्ड्यामुळे एखाद्याला नवीन जीवन मिळाले आहे.

बीपी वाढला अन् मृत्यू झाला, पण अचानक महिलेने उघडले डोळे; खड्ड्यामुळे थक्क करणारा चमत्कार; नेमकं काय घडलं?
Women DiedImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Mar 12, 2026 | 7:50 PM
Share

आपण अनेकांच्या तोंडून अशा घटना ऐकतो ज्यांच्यावर विश्वास बसणे कठीण होते. अशीच एक चकीत करणारी घटना समोर आली आहे. एका महिलेचा मृत्यू झाला होता. पण रुग्णवाहीकेमध्ये असे काही घडले की मृत महिला पुन्हा जिवंत झाली. अनेकांनी या महिलेचे प्रकरण ऐकून काळ आला होता पण वेळ आली नव्हती असे म्हटले आहे. आता नेमकं काय झालं? चला जाणून घेऊया…

५० वर्षीय विनीता शुक्ला यांना डॉक्टरांनी ब्रेन डेड घोषित केले होते. कुटुंबीयांना घरात अंतिम संस्काराची तयारी करण्यास सांगितले गेले होते. कुटुंबीय तिला रुग्णवाहिकेने बरेली-हरिद्वार नॅशनल हायवे NH-74 मार्गे घरी घेऊन जात होते. रस्त्यातील एका खड्ड्यात रुग्णवाहिकेचा टायर निघाला आणि जोरदार झटका लागला. त्यानंतर विनीता अचानक श्वास घेऊ लागल्या, असा दावा केला जात आहे.

एका रिपोर्टनुसार, पीलीभीत न्यायालयात काम करणाऱ्या विनीता २२ फेब्रुवारी रोजी घरात अचानक चक्कर येऊन पडल्या. प्रथम त्यांना पीलीभीतमधील स्थानिक हॉस्पिटलमध्ये नेले गेले, तेथून बरेलीला रेफर केले गेले. २४ फेब्रुवारी रोजी बरेलीतील हॉस्पिटलने त्यांना घेऊन जाण्यास सांगितले, कारण त्यांना वाचवण्याची कोणतीही आशा नाही असे सांगितले.

आता पूर्णपणे ठीक झालेल्या विनीता शुक्ला यांनी स्वतः सांगितले, “माझा बीपी थोडा वाढला होता. मी एक गोळी घेतली. त्यानंतर काय झाले ते माहिती नाही, मी बेशुद्ध झाले. कुटुंबीयांनी सांगितले की, डॉक्टरांनी सांगितले मूव्हमेंट होत नाही, तुम्ही घेऊन जा. पण आज मी पूर्णपणे स्वस्थ आहे. न्यूरो सर्जन डॉ. राकेश सिंह आमच्यासाठी देवासारखे आहेत.”

विनीताच्या पती कुलदीप यांनी सांगितले की, पत्नीची तब्येत बिघडली होती. त्यांनी बीपीची औषधे घेतली, पण १०-१५ मिनिटांत त्या बेशुद्ध झाल्या. प्रथम सरकारी हॉस्पिटल, नंतर मेडिसिटी हॉस्पिटलमध्ये गेल्या. दोन दिवस ठेवल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले, “घरी घेऊन जा, बीपी डाउन आहे आणि श्वासही घेता येत नाही.”

कुटुंबीयांच्या मते, डॉ. राकेश सिंह यांनी सांगितले की, रुग्णात ब्रेनस्टेम रिफ्लेक्सेस सापडत नव्हते – ही स्थिती ब्रेन डेड असल्याचे संकेत देते. ग्लासगो कोमा स्केल (GCS) मध्ये कमाल १५ असते, पण त्यांचा स्कोर फक्त ३ होता. म्हणजे रुग्ण पूर्णपणे बेशुद्ध असतो आणि आवाज, स्पर्श किंवा दुखापतीला प्रतिसाद देत नाही. न्यूरो सर्जनी तपासणी केली तेव्हा विनीताच्या डोळ्यातील पुतळ्या मोठ्या झाल्या होत्या आणि प्रकाशाने त्या आकुंचन पावत नव्हत्या. तपासणीत रक्तात न्यूरोटॉक्सिन (नर्व्हस सिस्टमला नुकसान करणारे विष) सापडले. हे विष कीटक किंवा सापाच्या दंशामुळे असू शकते, असे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर योग्य उपचार सुरू केले आणि एका आठवड्यानंतर त्या स्वतः श्वास घेऊ लागल्या. विनीता सुमारे १० दिवस डॉ. राकेश यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल होत्या आणि आता घरात परत आल्या आहेत.

Follow Us
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...