Maratha Reservation: सुप्रीम कोर्ट म्हणालं मराठा आरक्षण म्हणजे अल्ट्रा व्हायर्स: गुणरत्न सदावर्ते

| Updated on: May 05, 2021 | 2:28 PM

याप्रकरणात इंदिरा साहनी खटल्याच्या अनुषंगाने फेरविचार करण्याची गरज नाही, असेही न्यायालयाने म्हटल्याचे गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले. | Maratha Reservation gunratna sadavarte

Maratha Reservation: सुप्रीम कोर्ट म्हणालं मराठा आरक्षण म्हणजे अल्ट्रा व्हायर्स: गुणरत्न सदावर्ते
अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते
Follow us on

मुंबई: मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास (SEBC) प्रवगातंर्गत दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात बुधवारी झालेल्या सुनावणीवेळी रद्दबादल ठरवण्यात आले. अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते (gunratna sadavarte) यांनी या निर्णयाचे जोरदार स्वागत केले. भारतीय संविधान आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने आज गुणवंतांना न्याय दिला आहे, असे त्यांनी म्हटले. (gunratna sadavarte on SC strikes down Maratha Reservation)

मराठा आरक्षणाचा निर्णय हा अल्ट्रा व्हायर्स म्हणजे अधिकार क्षेत्राबाहेर असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. तसेच याप्रकरणात इंदिरा साहनी खटल्याच्या अनुषंगाने फेरविचार करण्याची गरज नाही, असेही न्यायालयाने म्हटल्याचे गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले.

छत्रपती संभाजीराजे काय म्हणाले?

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगितीचा निर्णय दिला. निकाल हा निकाल आहे, पण मराठा समाजासाठी हे दुर्दैव आहे, असं मत छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केलं. माझा लढा गरीब मराठा घटकांसाठी होता. पण निकाल मान्य करावा लागतो.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द ठरवल्यामुळे आता काहीतरी मार्ग काढणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रित प्रयत्न करण्याची गरज नाही. तुर्तास मराठा विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थांमध्ये जास्तीच्या जागा मिळण्यासाठी सुपरन्यमुररी हाच एकमेव पर्याय दिसत आहे. त्यासाठी राज्य सरकारला कोणत्याही परवानगीची गरज लागणार नाही. त्यामुळे आता राज्य सरकारने सुपरन्युमररी सूत्राचा वापर करून शैक्षणिक संस्थांमधील जागा वाढवाव्यात, असे संभीजीराजे यांनी सांगितले.

सध्याची कोरोनाची स्थिती भयानक आहे. अशा परिस्थितीत मराठा समाजाचा उद्रेक होणे योग्य ठरणार नाही. आरक्षण घेण्यासाठी आधी आपण जिवंत राहिले पाहिजे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत मराठा समाजाने कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन संभीजीराजे यांनी केले.

संबंधित बातम्या:

Maratha Reservation: महाराष्ट्र सरकारला मोठा झटका, मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द, कोर्टात कोण काय म्हणालं? ते वाचा सविस्तर

Maratha Reservation: मराठा आरक्षण रद्द, छत्रपती संभाजीराजे म्हणतात, आता ठाकरे सरकारनं ‘हे’ करावं!

(gunratna sadavarte on SC strikes down Maratha Reservation)