Mumbai Mega block news : मुंबईत आज तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक; लोकलचे वेळापत्रक चेक करा गैरसोय टाळा

आज मध्य, पश्चिम आणि हार्बर अशा तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान काही लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

Mumbai Mega block news : मुंबईत आज तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक; लोकलचे वेळापत्रक चेक करा गैरसोय टाळा
मेगा ब्लॉक
Image Credit source: TV9
| Updated on: Jun 12, 2022 | 7:58 AM

मुंबई : आज मध्य, पश्चिम आणि हार्बर अशा तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक (Mega block) घेण्यात येणार आहे. मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. हार्बर रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) ते चुनाभट्टी दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर मध्य रेल्वेवर (Central Railway) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वेचे तांत्रिक कामे तसेच रुळाच्या देखभालीसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. मध्य रेल्वेप्रमाणेच पश्चिम रेल्वेवर देखील आज ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर माहीम ते वांद्रे स्थानकांदरम्यान सहा तासांचा ब्लॉक घेतला जणार आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून आज घेण्यात येणाऱ्या ब्लॉकमुळे प्रवाशांचे वेळापत्रक बिघडण्याची शक्यता आहे. ब्लॉकदरम्यान काही फास्ट लोकल या धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तर काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वे ब्लॉक

मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार या मार्गावर अप आणि डाऊन धिम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 10 वाजून 55 मिनिटांपासून ते दुपारी 3 वाजून 55 मिनिटांपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. या मार्गावर आज पाच तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात या मार्गावर धावणाऱ्या काही धिम्या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही लोकल या धिम्या मार्गावरून जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. विद्याविहारवरून पुढील मार्गावर मात्र धीम्या मार्गावरील लोकलच्या फेऱ्या सुरळीत सुरू राहणार आहेत.

हार्बर रेल्वे ब्लॉक

हार्बर रेल्वेवर सीएसएमटी ते चुनाभट्टी दरम्यान ब्लॉक घेतला जाणार आहे. अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गावर हा ब्लॉक घेतला जाणार आहे. सकाळी 11 वाजून 10 मिनिटांनी ब्लॉकला सुरुवात होणार असून, दुपारी 4 वाजून 40 मिनिटांपर्यंत हा ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉक दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून वडाळा रोड, वाशी, बेलापूर, पनवेलकरता सुटणाऱ्या अप आणि डाऊन फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. या काळात पनवेल-कुर्ला दरम्यान विषेश फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वे ब्लॉक

तर पश्चिम रेल्वेवर माहीम ते वांद्रेदरम्यान आज सकाळी 10 वाजून 55 मिनिटांनी ब्लॉकला सुरुवात होणार असून, दुपारी 4 वाजून 55 मिनिटांपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक काळात वळणावरील रुळांचे काम करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. ब्लॉकदरम्यान काही लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही फेऱ्या या धिम्या आणि काही जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.