पनवेल आयुक्तांचं आवाहन, मेट्रोपोलीस लॅबची साथ, तब्बल 4.5 कोटींच्या कोरोना चाचण्या मोफत!

| Updated on: May 28, 2020 | 8:21 PM

पनवेल महापालिकेचे नवे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी (Panvel Municipal commissioner Sudhakar Deshmukh) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण उपाययोजना केली आहे.

पनवेल आयुक्तांचं आवाहन, मेट्रोपोलीस लॅबची साथ, तब्बल 4.5 कोटींच्या कोरोना चाचण्या मोफत!
Follow us on

नवी मुंबई : पनवेल महापालिकेचे नवे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी (Panvel Municipal commissioner Sudhakar Deshmukh) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण उपाययोजना केली आहे. सुधाकर देशमुख यांनी आयसीएमआरकडून मान्यप्राप्त असलेल्या मेट्रोपोलीस या खासगी लॅबला मोफत चाचणी करण्याची पत्राद्वारे विनंती केली होती. त्यांच्या या विनंतीला मेट्रोपोलीस लॅबकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. मेट्रोपोलीस लॅबने तब्बल 4.5 कोटी रुपयांच्या चाचण्या मोफत करण्याचं आश्वासन दिलं आहे (Panvel Municipal commissioner Sudhakar Deshmukh) .

मट्रोपोलीस लॅबने पनवेल शहरामध्ये पुढील 3 महिन्यात एकूण 10 हजार चाचण्या सीएसआर माध्यमातून मोफत करण्यासाठी तयारी दर्शवली आहे. आयुक्त सुधाकर देशमुख आणि मेट्रोपोलीस लॅबचे प्रतिनिधी डॉ. प्रदीप महिंद्रकर यांच्यात आज (28 मे) महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत चाचणीच्या नियोजनाची दिशा ठरविण्यात आली.

आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या प्रस्तावामुळे महानगरपालिकेस अंदाजे 4 कोटी 50 लाख इतक्या रकमेचा फायदा होणार आहे. महानगरपालिकेच्या निधीतून हा खर्च केला असता तर तेवढा भार मनपाच्या तिजोरीवर पडणार होता.

आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या दमदार सुरुवातीची ही झलक आहे. दरम्यान, “पनवेल शहराला लवकरच कोरोनामुक्त करण्यासाठी नागरिकांनी महानगरपालिकेस नियम पाळून सहकार्य करावे”, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

सुधाकर देशमुखांची उल्हासनगर महापालिका येथून पनवेल महापालिकेत बदली

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे काही दिवसांपूर्वीच मुंबई महापालिकेत मोठे फेरबदल करण्यात आले होते. मुंबई परिसरातील अन्य महापालिकेतसुद्धा मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.

सुधाकर देशमुख यांची गेल्या आठवड्यात उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्तपदावरुन पनवेल महापालिका आयुक्तपदी बदली करण्यात आली. तर पनवेलचे आयुक्त गणेश देशमुख यांची ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

मुंबई महापालिका आयुक्तांची बदली

काही दिवसापूर्वी म्हणजे 8 मे रोजी मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना हटवण्यात (BMC commissioner Praveen Pardeshi transferred) आलं होतं. ठाकरे सरकारने मुंबई महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांची बदली करुन त्यांच्या जागी इक्बालसिंह चहल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

नगरमध्ये कोरोनाबाधित गर्भवती महिलेचं सिझेरियन, डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे जुळ्यांना जीवनदान

Kolhapur Corona | कोल्हापुरातील डोंगराळ आणि गवताळ शाहूवाडी तालुक्यात कोरोना कसा पोहोचला?

केवळ 450 रुपयात कोरोना टेस्ट, 5 मिनिटात रिपोर्ट, आव्हाडांच्या पुढाकाराने ठाण्यात चाचण्या

महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीत सुधारणा, मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचा दावा

सायन हॉस्पिटलच्या डॉक्टरांची कमाल, जीवाची बाजी लावून दीड महिन्याच्या कोरोनाबाधित बाळावर मेंदूची शस्त्रक्रिया