AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Girish Mahajan: मोर्चा वगैरे असल्यावर… भाजपच्या मोर्चाविरोधात त्रस्त महिलेचा संताप, महाजनांची पहिली प्रतिक्रिया काय?

Minister Girish Mahajan BJP Morcha: काल भाजपने जांबोरी मैदान परिसरात काँग्रेसविरोधात मोर्चा काढला. महिला आरक्षण बिल नामंजूर केल्यावरून मोर्चा काढण्यात आला. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. एका संतप्त महिलेने मोर्चेकऱ्यांना गेट आऊट म्हटले. तिच्या संतापाने मोर्चेकरीही भांबवले. आज या सर्व प्रकारावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Girish Mahajan: मोर्चा वगैरे असल्यावर... भाजपच्या मोर्चाविरोधात त्रस्त महिलेचा संताप, महाजनांची पहिली प्रतिक्रिया काय?
गिरीश महाजन Image Credit source: एजन्सी
| Updated on: Apr 22, 2026 | 12:35 PM
Share

Minister Girish Mahajan BJP Morcha: महिला आरक्षण बिल नामंजूर झाल्यावर भाजपने काल राज्यात जनआक्रोश मोर्चा काढला. मुंबईतील जांबोरी मैदान परिसरात त्यामुळे एकच गर्दी झाली. वाहतूक खोळंबा झाल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झाला. त्यातील एका महिलेच्या संतापाचा सामना मंत्री गिरीश महाजन यांनाही करावा लागला. या महिलेच्या रागाचा व्हिडिओ देशभरात व्हायरल झाला. या सर्व प्रकारावर आज गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. यापूर्वी असे मोर्चे निघाले नाहीत का? मोर्चेकरांमुळे 50 किलोमीटरपर्यंत हायवे जॅम झालेले पाहिलेले आहेत अशी प्रतिक्रिया देऊन त्यांनी पुन्हा वाद ओढावून घेतला.

मोर्चे वगैरे असल्यावर…

जांबोरी मैदान परिसरातील घटनेवर आज मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. मोर्चे वगैरे असल्यावर अशा गोष्टी घडतात असे ते म्हणाले. यापुढे काळजी घेऊ, असे महाजन म्हणाले. काल हजारो महिला मुंबई सह देशभरात रस्त्यावर उतरल्या होत्या. काँग्रेसने महिला आरक्षण विरोधात मतदान केले व बिल पास होऊ दिले नाही. काल ट्राफिक कोंडी झाली होती. सर्वच पक्ष मोर्चे काढतात. कालच्या मोर्चात एक भगिनी आल्या, त्या वाट्टेल त्या बोलल्या. पोलिसांना तक्रार करायची होती. मी बाईट देताना त्या आल्या. पोलिसांनी त्यांना समजावले. त्या नको त्या भाषेत बोलल्या. महिला पोलीस आल्या. आम्ही संयमाची भाषा वापरली. त्यांनी बाटली देखील फेकून मारली. आम्ही पोलिसांना सांगितले, चिडू नका त्यांना हवे ते बोलू द्या. महिलांच्या आरक्षणासाठीच तो मोर्चा होता. यापुढे काळजी घेऊ. मोर्चा व आंदोलनावेळी काळजी घेतली जाईल असे महाजन म्हणाले.

महिलेची कृती योग्य नाही

त्यांना त्यांचा राग वेगळ्या भाषेत मांडता आला असता. आम्ही रितसर परवानगी घेऊन मोर्चा काढला होता. सायंकाळची वेळ होती. रात्री तर मोर्चा निघू शकत नाही. मार्ग ठरलेला होता. नियोजन केलेले होते. त्यांचा राग फार अनावर झाला होता. महिला आरक्षणासाठीच हा मोर्चा होता. त्या मोर्चाविरोधात तक्रार करू शकल्या असत्या. जी भाषा वापरली ती संयुक्तिक नव्हती. त्यांनी बाटली फेकून मारली. सौम्य भाषेत ही राग व्यक्त करता आला असता, असे महाजन म्हणाले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...