आमदार, उद्योगानंतर मंत्रिमंडळही गुजरातमध्ये, आदित्य ठाकरे यांची या नेत्यावर टीका

| Updated on: Nov 23, 2022 | 9:20 PM

प्रचारासाठी मंत्रिमंडळ घेऊन गेल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.

आमदार, उद्योगानंतर मंत्रिमंडळही गुजरातमध्ये, आदित्य ठाकरे यांची या नेत्यावर टीका
आदित्य ठाकरे
Follow us on

मुंबई – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या गुजरातमध्ये प्रचारसभा घेत आहेत. मात्र, फडणवीस यांच्या प्रचारसभेवरून आदित्य ठाकरे यांनी टीका केली. फडणवीस गुजरातमध्ये प्रचारासाठी गेल्यानं मंत्रिमंडळाची बैठक रद्द करण्यात आली, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. आदित्य ठाकरे म्हणाले, मंत्रिमंडळ गुजरातमध्ये प्रचारात व्यस्त आहे. मंत्रिमंडळाची बैठकही महत्त्वाची असते. ओल्या  दुष्काळाची मागणी तशीच आहे. निकष बदलण्यासाठी उपसमितीची बैठक रद्द झाली आहे.

आधी आमदार घेऊन गेले. नंतर उद्योग घेऊन गेले. आता तर प्रचारासाठी मंत्रिमंडळ घेऊन गेल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. प्रचार व्हावा, परंतु, महाराष्ट्राच्या कॅबिनेटची बैठक होणे गरजेचे असल्याचंही ते म्हणाले.

आदित्य ठाकरे यांच्या टीकेला प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिलंय. दर आठवड्याला मंत्रिमंडळाची बैठक होते. आदित्य ठाकरे यांनी माहिती घेऊन आरोप करावेत, असं दरेकर म्हणालेत. मला वाटतं आदित्य ठाकरे यांचं नीट लक्ष दिसत नाही. विरोधी पक्षाचे आमदार म्हणून सरकार आणि मंत्रिमंडळावर लक्ष हवं. केवळ राजकीय उद्देशानं आरोप करू नये. त्यामुळं आदित्य ठाकरे यांच्या बोलण्याकडं केवळ राजकीय टीका म्हणून पाहता येईल.

महाराष्ट्राबाहेर निवडणुका असल्या की, देवेंद्र फडणवीस यांच्या सभांची मागणी केली जाते. त्यानुसार फडणवीस हे गुजरातमध्ये प्रचारसभा घेत आहेत. पुन्हा एकदा भाजपला जिंकविण्याचं आवाहन मतदारांना करताहेत. निवडणुका गुजरातच्या असल्या तरी संपूर्ण देशाचं या निवडणुकांकडं लक्ष आहे. ८ डिसेंबरला निकाल लागल्यानंतर गुजरात कोणासोबत आहे, हे दिसणार असल्याचं देवेंद्र फडणवीस प्रचारसभेत सांगतात.