“काँग्रेस आणि राष्ट्रवादीने हिंदुत्वावर बोलावं”; भाजपच्या या नेत्यानं हिंदुत्वावरून विरोधकांना डिवचलं

| Updated on: Feb 23, 2023 | 9:18 PM

कसबा पोटनिडणुकीवरून हिंदुत्वाचा मुद्दा आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ज्या प्रमाणे प्रवीण दरेकर यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावरून राष्ट्रवादीला छेडले आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने हिंदुत्वावर बोलावं; भाजपच्या या नेत्यानं हिंदुत्वावरून विरोधकांना डिवचलं
Follow us on

मुंबईः पुण्यातील कसबा पोटनिवडणुकी्च्या प्रचारावरून राज्यातील राजकारण प्रचंड तापले आहे. त्यातच हिंदुत्वाच्या मुद्यावरूनही सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. एकीकडे महाविकास आघाडीने भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांना गंभीर आजारी असतानाही त्यांना प्रचारात आणले असल्याने महाविकास आघाडीने भाजपवर टीका केली होती. तर त्यावर प्रत्युत्तर देत भाजपनेही या पोटनिवडणुकीत शरद पवार यांनाही उतारावं लागतं तेही या वयात त्यावरून कळून चुकलं आहे असा जोरदार हल्ला भाजपच्या प्रवीण दरेकर यांनी केले आहे.

पु्ण्याच्या कसबा पोटनिवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी कसबा हे हिंदुत्वाचे कसबा आहे असं म्हटले होते, तर दुसरीकडे प्रवीण दरेकर यांनी आमचा श्वास हिंदूत्व आहे, त्यामुळे आम्ही हिंदुत्वाचाच मुद्दा मांडणार असल्याचेही प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

भाजपचा श्वास म्हणजे हिंदुत्व आहे आणि तेच हिंदुत्व आम्ही मांडत असतो अशा भाषेत त्यांनी ठणकावून सांगितले आहे. आम्ही ज्या प्रमाणे हिंदुत्व मांडतो आहे तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही हिंदुत्वावर बोलावे असा टोला प्रवीण दरेकर यांनी हिंदुत्वावरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसला त्यांनी छेडले आहे.

कसबा पोटनिडणुकीवरून हिंदुत्वाचा मुद्दा आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ज्या प्रमाणे प्रवीण दरेकर यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावरून राष्ट्रवादीला छेडले आहे. त्याच प्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनीही  कसबा पोटनिवडणुकीतही त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावरून मतदारांना त्यांनी आवाहन केले आहे.

प्रवीण दरेकर यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही आता हिंदुत्वावर बोलावे असे आवाहन केल्यामुळे कसबा निवडणुकीत हा मुद्दा गाजणार असल्याचे दिसून येत आहे.