Manipur : ‘दोन्ही सरकारला लाजा वाटायला…’; मणिपूरमधील आक्षेपार्ह व्हिडीओवरून राज ठाकरे संतापले!

मणिपूरमधील व्हिडीओमुळे देशात खळबळ उडाली असून बॉलिवूडमधील कलाकारांसह, विरोधी पक्षातील नेत्यांनीा या घटनेचा निषेध व्यक्त केला गेला आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि मणिपूरमधील राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

Manipur : दोन्ही सरकारला लाजा वाटायला...; मणिपूरमधील आक्षेपार्ह व्हिडीओवरून राज ठाकरे संतापले!
| Updated on: Jul 20, 2023 | 10:38 PM

मुंबई : मणिपूरमध्ये हिंसा सुरू असताना दोन महिलांचा नग्न अवस्थेतील व्हिडीओ  समोर आला आहे. या व्हिडीओमुळे देशात खळबळ उडाली असून बॉलिवूडमधील कलाकारांसह, विरोधी पक्षातील नेत्यांनीा या घटनेचा निषेध व्यक्त केला गेला आहे. या महिलांना नग्न नाहीतर त्यांच्या शरीराला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि मणिपूरमधील राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

कालपासून मणिपूर मधली समाजमाध्यमांवर जी दृश्य समोर आली आहेत ती हादरवणारी आहेत आणि दोन्ही सरकारांना लाज वाटायला लावणारी आहेत. मी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान महोदयांना आणि गृहमंत्र्यांना पत्र लिहून विनंती केली होती की आता तरी ह्या विषयात लक्ष घालून मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होईल हे पहा, पण परिस्थिती ‘जैसे थे’ आहे आणि हेच दुर्दैव आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

 

या प्रकरणातील जे गुन्हेगार आहेत त्यांना फाशीचीच शिक्षा व्हायला हवी. पण त्याचवेळेस जर केंद्रसरकारकडून ठोस कृती होणार नसेल तर, आता राष्ट्रपती महोदयांनी ह्यात लक्ष घालायला हवं. मणिपूरमध्ये गेल्या 3 महिन्यात जे घडलं त्याने फक्त मणिपूरच नाही तर संपूर्ण भारताच्या समाजमनावर ओरखडा उमटला असल्याचं ठाकरे म्हणाले.

दरम्यान, काही वर्षांनी एखादं आक्रीत घडलं तर त्याला मात्र सध्याचंच सरकार जबाबदार असेल. पंतप्रधानांनी आता जरी ह्या घटनेचा निषेध केला असला तरी तो पुरेसा नाही, आता कृती करा, अन्यथा ईशान्य भारत कायमचा भारतापासून तुटेल, अशी भीतीही ठाकरेंनी वर्तवली आहे.