VIDEO: राऊतांच्या आरोपांवर आता कंबोज यांचीच कोर्टात जायची तयारी, जीतू नवलानी रॅकेट कसे चालवायचा? सीबीआय चौकशीची मागणी

| Updated on: Mar 15, 2022 | 10:29 AM

शिवसेना नेते संजय राऊत यांनी ईडीवर आरोप केल्यानंतर आता भाजप नेते मोहित कंबोज मैदानात उतरले आहेत. राऊत यांनी केलेल्या आरोपींची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी अन्यथा मी कोर्टात जाईल, असा इशारा मोहित कंबोज यांनी केला आहे.

VIDEO: राऊतांच्या आरोपांवर आता कंबोज यांचीच कोर्टात जायची तयारी, जीतू नवलानी रॅकेट कसे चालवायचा? सीबीआय चौकशीची मागणी
राऊतांच्या आरोपांवर आता कंबोज यांचीच कोर्टात जायची तयारी, जीतू नवलानी रॅकेट कसे चालवायचा? सीबीआय चौकशीची मागणी
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी ईडीवर (ED) आरोप केल्यानंतर आता भाजप नेते मोहित कंबोज (mohit kamboj) मैदानात उतरले आहेत. राऊत यांनी केलेल्या आरोपींची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी अन्यथा मी कोर्टात जाईल, असा इशारा मोहित कंबोज यांनी केला आहे. 8 मार्च रोजी राऊत यांनी खूप आरोप केले होते. सलीम-जावेद जसे नवीन काल्पनिक एपिसोड घेऊन येतात तसे राऊत हे एपिसोड घेऊन आले. राऊत यांनी जे आरोप दिले आणि माहिती दिली ती अर्धवट होती. जीतू नवलानी अनेकांकडून पैसे घेत असल्याचे आरोप त्यांनी केले आहे. 13 पानांचे पत्रं त्यांनी दिले आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी पैसे घेतले असा आरोप त्यांनी केला आहे. राऊत यांनी 160 कोटी रुपयांचा आरोप केला. जीतू नवलानीने ईडीच्या नावाने पैसे घेतल्याचं त्यांनी सांगितलं. या आरोपात तथ्य असते तर राऊत यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभाग किंवा सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी केली असती. त्यामुळे या सर्वांची चौकशी झाली पाहिजे, असं मोहित कंबोज म्हणाले.

मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. सेंट्रल एजन्सीची जर चौकशी करायची असेल तर सीबीआय आहे. या कंपन्यांवर सुद्धा गुन्हे नोंद केले पाहिजेत. कारण लाच देणारा आणि घेणारा दोन्ही गुन्हेगार असतात. या मध्ये सगळ्यांना आरोपी केलं पाहिजे. हे आरोप करताना उद्धव ठाकरे यांची सहमती होती का? मुख्यमंत्र्यांनी याबाबत सीबीआयला पत्र लिहिले पाहिजे. या पत्रात काहीही सत्य नाही. स्वत:ला वाचवण्यासाठी हा खेळ खेळत आहेत. खंडणीची नवी सुरवात संजय राऊत करत आहेत का? असा सवाल कंबोज यांनी केला.

मुख्यमंत्र्यांनीच चौकशीची मागणी करावी

जीतू नवलानी मार्फत कसे पैसे ईडीला जातात याचा खुलासा राऊत यांनी केला पाहिजे. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सीबीआय तपासाची मागणी केली पाहिजे हा संवेदनशील विषय आहे. जर 15 दिवसात महाराष्ट्र सरकारने काही केले नाही तर आम्ही जनहित याचिका दाखल करणार आणि गुन्हा नोंद करण्याची मागणी करणार आहोत, असं त्यांनी सांगितलं.

तो फोटो माहिम दर्ग्यातील कार्यक्रमातील

डॉ. मुदस्सीर लांबे हे निवडून आलेले आहे त्यामुळे ते वक्फ बोर्डचे मेंबर झाले. ते नॉमिनेटेड नाही. पण राष्ट्रवादीशी संलग्न आहे. शरद पवारांबरोबर यांचा फोटो आहे. दाऊदशी संबंधित लोक राष्ट्रवादीशी कसे जोडले जातात याचे उत्तर द्या. देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर त्यांचा फोटो आहे. तो माहीम दर्ग्यातील कार्यक्रमातील आहे. कारण लांबे तिथे ट्रस्टी होता, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या:

प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ, मुंबै बँकेतील बोगस मजूर प्रकरणी गुन्हा

कॉपी करु देण्यासाठी दहावीच्या परीक्षार्थीकडे 30 हजारांची लाच, औरंगाबादेत संस्थाचालक अटकेत

Maharashtra News Live Update : विरोधी पक्षेनेते प्रवीण दरेकरांवर गुन्हा दाखल