
गेल्या काही दिवसांत भीषण अपघाताच्या बातम्या समोर आल्या. असाच एक धक्कादायक अपघात मुंबई-गोवा मार्गावर घडला आहे.

मुंबई -गोवा मार्गावरील खेड कशेडी घाटात काल रात्री एका चालत्या गाडीने पेट घेतला. तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता कशा प्रकारे गाडीनं भीषण पेट घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही.

पनवेल इथून खेडकडे जाणाऱ्या या कारने अचानक पेट घेतला.

वेळीच चालकाच्या लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला.

भर रस्त्यात गाडी पेटत असल्यामुळे काही काळ या घाटातील वाहतून ठप्प झाली होती. मात्र, त्यानंतर वाहुतक पुन्हा सुरू झाली.