बापरे, थेट इतका पगार कापला, मुंबई BMC कर्मचाऱ्यांना मोठा दणका, ठाणे पालिकेत कर्मचाऱ्यांवर काय निर्बंध घातले?

मुंबई महापालिका रुग्णालयातील परिचारीकांवर कामाचा विशेष दबाव असतो. एका-एका वॉर्डात 90 ते 100 च्या वर रुग्ण असतात. त्यात दोन ते तीन नर्सेसना अख्खा वॉर्ड संभाळायचा असतो. एखादी छोटीशी चूकही रुग्णाच्या जीवावर बेतू शकते.

बापरे, थेट इतका पगार कापला, मुंबई BMC कर्मचाऱ्यांना मोठा दणका, ठाणे पालिकेत कर्मचाऱ्यांवर काय निर्बंध घातले?
BMC
| Updated on: Mar 26, 2026 | 10:36 AM

​सॅप प्रणालीने मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना मोठा झटका दिला आहे. सॅप प्रणालीतील काही तांत्रिक कारणांमुळे महापालिकेच्या 25 हजार कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. मार्च महिन्याच्या त्यांच्या पगारात तब्बल 10 ते 50 हजारांची कपात झाली आहे. प्रशासकीय गोंधळामुळे पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी अक्षरश: रडकुंडीला आले आहेत. मुंबई महापालिका रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागतोय. परिचारिका म्हणजे नर्सना मूळ वेतनाच्या 10 ते 20 टक्के वेतनापोटी रक्कम मिळेल अशी स्थिती आहे. केईएम, नायर, शीव, कूपर ही महापालिकेची मुंबईतील मोठी रुग्णालयं आहेत. त्यांचं मार्च महिन्याचं वेतन मोठ्या प्रमाणात कापण्यात आलं आहे.

मुंबई महापालिका रुग्णालयातील परिचारीकांवर कामाचा विशेष दबाव असतो. एका-एका वॉर्डात 90 ते 100 च्या वर रुग्ण असतात. त्यात दोन ते तीन नर्सेसना अख्खा वॉर्ड संभाळायचा असतो. एखादी छोटीशी चूकही रुग्णाच्या जीवावर बेतू शकते. कामाचा इतका ताण असताना आता रुग्णालय कर्मचाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात वेतन कापण्यात आलं आहे. त्यामुळे महिन्याचे दैनंदिन खर्च कसे भागवायचे? मुलांच्या शाळांची फी, किराणा सामना असा प्रश्न महापालिका कर्मचाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.

संपाचा गर्भित इशारा

BMC कर्मचाऱ्यांचं वेतन हे सॅप या संगणकीय प्रणालीद्वारे काढण्यात येतं. तांत्रिक कारण, आऊट ड्युटी, निवडणूक कर्तव्य, रजा याची वेळोवेळी सॅप प्रणालीत नोंद करणं आवश्यक असतं. महापालिकेच्या मनुष्यबळ विभागाकडून सर्व विभागांना अनेकदा या बद्दल सांगण्यात आलं. पण सॅपवर वेळोवेळी नोंद झाली नाही. परिणामी अनेकांचे 30 ते 50 हजार रुपये पगार कापण्यात आला आहे. ​कामगार संघटना या मुद्यावर आक्रमक झाल्या आहेत. बेकायदेशीर पगार कपातीविरोधात ‘म्युनिसिपल मजदूर युनियन’ने संपाचा गर्भित इशारा दिला आहे.
​प्रशासन आणि संघटना आमने-सामने आहे. “आमची चूक नाही” म्हणत कर्मचाऱ्यांकडून तातडीने पगार देण्याची मागणी.

ठाणे महापालिकेत कर्मचाऱ्यांवर काय निर्बंध?

ठाणे महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर राजकीय पक्षांशी संबंधित पोस्ट, चिन्हे किंवा नेत्याचे छायाचित्र स्टेटस म्हणून ठेवण्यावर प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. या संदर्भात मुख्यालयाचे उपयुक्त गजानन गोदेपुरे यांनी अध्यादेश काढून स्पष्ट सूचना दिल्या आहेत. या आदेशानुसार अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी आपल्या मोबाईल व्हाट्सअप किंवा अन्य सोशल मीडियावर राजकीय पक्षाचे प्रचारात्मक, साहित्य, बॅनर, पोस्टर किंवा विशिष्ट नेत्यांचे फोटो स्टेटस म्हणून ठेवू नये. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्याला कोणतीही पूर्व सूचना न देता थेट शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

Follow Us