स्वच्छ सर्वेक्षण 2019-20 च्या तिमाहीत मुंबई आठव्या क्रमांकावर

| Updated on: Jan 03, 2020 | 8:40 PM

यंदाच्या 2019-20 वर्षातील स्वच्छ भारत’ अभियानाअंतर्गत पहिल्या दोन तिमाहीमध्ये करण्यात आलेल्या स्वच्छताविषयक सर्वेमध्ये (Mumbai city get eight ranking in cleaning survey) मुंबईचा घसरलेला क्रमांक सावरला आहे.

स्वच्छ सर्वेक्षण 2019-20 च्या तिमाहीत मुंबई आठव्या क्रमांकावर
Follow us on

मुंबई : यंदाच्या 2019-20 वर्षातील स्वच्छ भारत’ अभियानाअंतर्गत पहिल्या दोन तिमाहीमध्ये करण्यात आलेल्या स्वच्छताविषयक सर्वेमध्ये (Mumbai city get eight ranking in cleaning survey) मुंबईचा घसरलेला क्रमांक सावरला आहे. नुकत्याच सरलेल्या वर्षांच्या पहिल्या तिमाहीमध्ये मुंबईला 13 वा, तर दुसऱ्या तिमाहीमध्ये आठव्या क्रमांकावर स्थान मिळालं आहे. तथापि, मुंबईतील शौचालयांची संख्या, राखण्यात येणारी स्वच्छता, मालमत्ता करामध्ये अंतर्भूत केलेलं कचराविषयक शुल्क, बंदीयोग्य प्लास्टिकवर करण्यात आलेली कारवाई याबाबत सादर केलेल्या माहितीच्या आधारे मुंबईला (Mumbai city get eight ranking in cleaning survey) देशातील पहिल्या 20 शहरांच्या यादीत स्थान देण्यात आलं आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर मानाचं स्थान असलेल्या मुंबईचं स्वच्छ सर्वेक्षणातील स्थान डळमळीत झाल्यामुळे विविध स्तरातून पालिकेवर टीका करण्यात आली होती. परिणामी, पालिकेने ‘स्वच्छ भारत’ अभियान डोळ्यासमोर ठेवून मुंबईत स्वच्छता राखण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या होत्या. अभियानाच्या निकषांनुसार पालिकेने मुंबईत सार्वजनिक शौचालये उपलब्ध केली. कचरा गोळा करण्यासाठी मुंबईकरांकडून शुल्क घेण्यात येत नसल्यामुळे 2018-19 मध्ये ‘स्वच्छ भारत’मध्ये मुंबईचा क्रमांक गडगडला होता. त्यामुळे कचराविषयक शुल्क मालमत्ता करातून वसूल करण्याची क्लृप्ती पालिकेने लढवली.

त्याचबरोबर ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करणाऱ्या सोसायटींना मालमत्ता करामध्ये सवलत देण्याची योजना पालिकेने सुरु केली. मालमत्ता करात वसूल करण्यात येणाऱ्या कचऱ्यावरील कर आणि मालमत्ता करात देण्यात येत असलेली सवलत याची माहिती पालिकेने स्वच्छ सर्वेक्षणासाठी सादर केली होती. त्याचबरोबर मुंबईमध्ये पालिकेने बंदीयोग्य प्लास्टिकवर केलेल्या कारवाईचा तपशीलही स्वच्छ सर्वेक्षणासाठी सादर केला. त्याची सकारात्मक दखल घेण्यात आली आहे. पालिकेने सादर केलेल्या माहितीच्या आधारे 2019-20 या वर्षांच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये देशभरातील शहरांमध्ये मुंबईला 13 वा क्रमांक देण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्या तिमाहीमध्ये मुंबईने आठवा क्रमांक पटकावला. त्यामुळे पालिका अधिकारी खूष झाले आहेत.

स्वच्छ सर्वेक्षणात 2016-17 मध्ये मुंबईला 29 वा क्रमांक मिळाला होता. त्यानंतर 2017-18 मध्ये मुंबईने 18 वा क्रमांक पटकावला होता. मात्र 2018-19 मध्ये सर्वेक्षणाच्या निकषांची पूर्तता करण्यात पालिका अपयशी ठरली आणि त्यामुळे मुंबईचा क्रमांक 49 वर घसरला होता. मात्र, या वर्षांच्या पहिल्या तिमाहीत मुंबईला 13 वे आणि दुसऱ्या तिमाहीत आठवे स्थान देण्यात आले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वच्छता राखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबाबत सादर केलेल्या माहितीद्वारे शहरांना क्रमांक देण्यात आला आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांनी सादर केलेल्या माहितीची प्रत्यक्षात पाहणी करण्यासाठी स्वच्छ भारतचे पथक जानेवारी महिन्यात शहरांना भेटी देणार आहेत. लवकरच हे पथक मुंबईमध्येही दाखल होणार आहे. या पथकाच्या अहवालानंतर देशभरातील शहरांची अंतीम यादी तयार करण्यात येणार असून त्यामध्ये मुंबईला कोणते स्थान मिळते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.