
मुंबई : डोक्यावर गांधी टोपी, गळ्यात तुळशी माळ, पांढरा लेंगा आणि सफेद सदरा, अशी मुंबईच्या डब्बेवाल्यांची ओळख. मुंबईच्या डब्बेवाल्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून ही ओळख कायम राखली आहे.. गिरणी कामगार, कार्यालय, शाळेतील विद्यार्थी यांना अचूक वेळेत आणि अचूक जागी डब्बे पोहचवण्याचे डब्बेवाले यांचे तंत्र जगात प्रसिद्ध आहे. ब्रिटनच्या राजापासून अनेकांनी मुंबईच्या डब्बेवाल्यांचे कौतूक केले आहे. इतकेच नव्हे तर त्यांना ‘मॅनेजमेंट गुरु’ अशी पदवीही देता त्यांच्या कामाचा गौरव केला आहे. मुंबईच्या सामाजिक आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग बनलेल्या अशा या डब्बेवाल्यांवर मात्र संक्रात आली आहे. मुंबईचा डब्बेवाला आता नामशेष होण्याच्या मार्गावर आलाय. दिवसाला पाच लाख डब्ब्यांची देवाण-घेवाण करणारे हे डब्बेवालं आपलं अस्तित्त्व टिकवण्यासाठी झगडताना दिसत आहेत. याची नेमकी कारणे काय? याला कोण जबाबदार? जाणून घ्या. मुंबई डब्बेवाल्यांचा इतिहास मुंबईमध्ये डब्बेवाल्यांनी आपल्या बस्तान हे काही ठरवून मांडलं नाही. भारतात इंग्रजांचे राज्य होते तेव्हापासून हे डब्बेवाले काम...