Thackeray Brothers Alliance : उद्या 12 वाजता… ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं राज्यभरात चर्चांना उधाण
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षांच्या युतीची घोषणा उद्या दुपारी १२ वाजता होणार आहे. खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत ही माहिती दिली. आगामी महानगरपालिका निवडणुका एकत्र लढण्यासाठी ही युती होत असून, एका पत्रकार परिषदेद्वारे घोषणा होण्याची शक्यता आहे. जागा वाटपाचा तिढा सुटल्याचे नेत्यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील बहुचर्चित युतीची घोषणा उद्या दुपारी १२ वाजता होणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीटद्वारे ही माहिती अधिकृतपणे दिली आहे. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा जुना फोटो ट्वीट करत या घोषणेचे संकेत दिले. आगामी महानगरपालिका निवडणुका एकत्र लढण्याच्या उद्देशाने ही युती होणार आहे. दोन्ही बंधूंनी एकत्र येऊन पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा करण्याची शक्यता आहे. जागा वाटपासंदर्भात असलेला तिढा सुटल्याचेही वृत्त आहे. अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या भेटीगाठी आणि चर्चांना यामुळे पूर्णविराम मिळाला आहे.
Published on: Dec 23, 2025 03:50 PM
Latest Videos
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला
सरपंच हत्येप्रकरणी मोठी अपडेट आल्यानंतर धनंजय देशमुख यांची मागणी काय?
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर..

