मुंबईत दिवाळीच्या 5 दिवसात आगीचं तांडव, तब्बल 333 आगीच्या घटना, फटक्यांमुळे दोन जणांचा मृत्यू

मुंबईत दिवाळीच्या 5 दिवसात आगीचं तांडव पाहायला मिळालं. शहरात तब्बल 333 आगीच्या घटना घडल्या. या फटक्यांमुळे दोन जणांचा मृत्यू झाला.

मुंबईत दिवाळीच्या 5 दिवसात आगीचं तांडव, तब्बल 333 आगीच्या घटना, फटक्यांमुळे दोन जणांचा मृत्यू
mumbai fire
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 12, 2026 | 7:51 AM

मुंबईत दिवाळीच्या पाच दिवसांच्या कालावधीत फटक्यांमुळे अग्नीतांडव पाहायला मिळालं. दिवाळीतील 6 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबरच्या मुंबईत आगीच्या तब्बल 499 घटना घडल्या आहेत. या पाच दिवसांत 333  आगीच्या घटना फटक्यांमुळे घडल्याचे समोर आले आहे. आगीच्या घटनेमुळे दोघांचा मृत्यू झाला. तर आठ जण जखमी झाल्याची माहिती आहे. 9 नोव्हेंबर रोजी सर्वाधिक 166 आगीच्या घटना घडल्या. त्यातील 144  आगीच्या घटना या फटाक्यांमुळे घडल्या.

मुंबईत 10 नोव्हेंबर रोजी 102 आगीच्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी 24 आगीच्या घटना फटक्यांमुळे घडल्या आहेत. त्यातील 137 घटना या फटाक्यांमुळे घडल्या आहेत. गोरेगाव ते दहिसर या  भागात दोन दिवसांत 96 आगीच्या घटना घडल्या. तर झोन-4 मध्ये एकाचा आगीच्या दुर्घटना मृत्यू झाला. तर दोघे जखमी झाले. मालाड-मालवणीत फटाक्यांच्या स्फोटामुळे दुकानाचा स्लॅबचा भाग कोसळून एका 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. शहानवाज नियान खान असे मुलाचे नाव आहे. ठाण्यानंतर मुंबईतही 9 नोव्हेंबर रोजीपासून आकाशा उडणाऱ्या फटाक्यांवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतरही लोकांकडून आतषबाजी सुरू असल्याचे दिसून आले. त्यामुळे मुंबईत फटाक्यांवरील बंदी फक्त कागदावरच आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला.

Loading...

बंदी असतानाही रॉकेट आणि आकाशात फोडण्यात आले फटाके 

दिवाळीत आकाशात उडणाऱ्या फटाक्यांवर बंदी घालण्यात आली, त्यानंतर रात्रीच्या वेळी कारवाईसाठी पथके तैनात करण्यात आली होती. परंतु या कारवाईसाठी अडचणी आल्याची कबुली पालिका अधिकाऱ्यांकडून कबुली देण्यात आली. फटाक्यांवरील बंदी अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मुंबई शहरात (Mumbai City) दिवाळीत फटाके फोडल्यामुळे मोठ्या प्रमाणात आगीच्या घटना घडल्याचे दिसून आले. या आगीच्या घटनांमध्ये बहुतांश घटना या फटाक्यांमुळे घडल्याचे दिसून आले. रॉकेट आणि आकाशात उडणारे फटाक्यांमुळे आगीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आलं. मात्र, पालिकेच्या बंदीनंतरही जूहू परिसरात मोठ्या प्रमाणात रॉकेट आणि आकाशात उडणारे मोठे फटाके फोडण्यात आले. त्यामुळे मुंबई महापालिकेचा आदेश फक्त कागदरावरच आहे का, असा सवाल सामान्य नागरिकांकडून विचारण्यात आला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us