Photo : कुर्ल्यात इमारत कोसळली, मंत्री आदित्य ठाकरेंकडून पाहणी, पाहा फोटो…

Aditya Thackeray : आदित्य यांनी दुर्घटनाग्रस्त कुटुंबांचं सांत्वन केलं.

| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Jun 28, 2022 | 3:41 PM
1 / 7
मुंबईतील कुर्ला पूर्व येथील शिवसूष्टी रोड या ठिकाणी एक चार मजली इमारत कोसळली.

मुंबईतील कुर्ला पूर्व येथील शिवसूष्टी रोड या ठिकाणी एक चार मजली इमारत कोसळली.

2 / 7

नेहरु नगर इथं असलेली ही एक चार मजली इमारत सोमवारी रात्री उशिरा कोसळली.

3 / 7

इमारत कोसळून अनेकजण खाली दबले गेले होते. या इमारतीमध्ये 20-25 जण राहत असल्याची माहिती मिळतेय. त्यापैकी 15-18 जणांना वाचवण्यात आलंय.तर या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे.

4 / 7

ही इमारत जुनी असल्याची माहिती मिळतेय. महानगरपालिकेतर्फे ही इमारत खाली करण्याची नोटीस दिली गेली होती. तरिही काही कुटुंब याठिकाणी राहत होती. घटनास्थळी अग्निशमन दलाकडून बचावकार्य केलं गेलं.

5 / 7

जेसीबीच्या मदतीने इमारतीचा कोसळलेला मलबा हटवून खाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यात आलं.

6 / 7

आदित्य ठाकरे यांनी या ठिकाणी जात पाहणी केली. तसंच बचावकार्य वेगात व्हावं, अश्या सूचना दिल्या.

7 / 7

तसंच आदित्य यांनी दुर्घटनाग्रस्त कुटुंबांचं सांत्वन केलं. त्यांना खचू नका, सरकार पाठिशी आहे, असं म्हणत धीर दिला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us