लग्नाच्या 20 वर्षानंतर मुलाचा जन्म, पण नियतीच्या मनात काही वेगळचं, मुंबईत मालाडमध्ये जे घडलं त्याने सगळेच हळहळले

लग्नाच्या 20 वर्षानंतर त्यांना बाळ झालं. पण त्यांच्या नशिबात मातृत्व आणि पितृत्वाचं सुख नव्हतं. नियतीच्या मनात काही वेगळचं होतं. काळ खूप क्रूर असतो. मुंबईत मालाडमध्ये जे घडलं, त्याने सगळेच हळहळले.

लग्नाच्या 20 वर्षानंतर मुलाचा जन्म, पण नियतीच्या मनात काही वेगळचं, मुंबईत मालाडमध्ये जे घडलं त्याने सगळेच हळहळले
Malad Hit & Run
| Updated on: Feb 10, 2026 | 7:45 AM

मालाडमध्ये हिट अँड रनची घटना घडली आहे. भरधाव वेगात असलेल्या इनोव्हा कारने दिलेल्या धडकेत चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी हिट अँड रनचा आरोप केला आहे. लग्नाच्या आनंदी वातावरणात, सिंग कुटुंबावर शोककळा पसरली आहे. आई-वडिलांना खूप दु:ख झालं. त्यांच्या मनाला ही गोष्ट खूप लागली. कारण लग्नाच्या 20 वर्षानंतर या मुलाचा जन्म झाला होता. लग्नानंतर इतक्या वर्षांनी जन्मलेल्या मुलाचा असा दुर्देवी मृत्यू पाहणं हा आई-वडिलांसाठी मोठा धक्का आहे. वडिलांनी सांगितलं की, मुलाच्या मृत्यूनंतरही पोलीस आरोपीला जामीन देत होते. लक्ष्य सिंग असं मुलाचं नाव आहे.

मुंबईतील मालाड पूर्वेकडील निलयोग विराट बिल्डिंगमध्ये ही घटना घडली. सिंग यांच्या कुटुंबात 5 तारखेला लग्न होते. 6 तारखेला संपूर्ण कुटुंब एकत्र होते आणि ७ तारखेला सकाळी त्यांचा चार वर्षांचा मुलगा लक्ष्य इमारतीच्या खाली खेळत होता.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय दिसतं?

सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो मुलगा इमारतीच्या आत फिरताना दिसत आहे. मुलाला गाडीने धडक दिल्यानंतर थोडे अंतर गेल्यावर गाडी थांबते. मग इमारतीचा सुरक्षा रक्षक मुलाला उचलून रुग्णालयात घेऊन जाताना दिसतो. भरधाव वेगाने येणाऱ्या इनोव्हा क्रिस्टा कारने चार वर्षांच्या निष्पाप लक्ष्यला धडक दिली आणि इनोव्हा कारचा चालक अपघाताची माहिती सुरक्षा रक्षकाला दिल्यानंतर तेथून पळून गेला.

आरोपीची त्या इमारतीत पार्किंग

लक्ष्यच्या वडिलांनी सांगितलं की, “अपघातानंतर जर कार चालकाने माझ्या मुलाला ताबडतोब रुग्णालयात नेले असते, तर कदाचित तो वाचला असता” मृत लक्ष्यच्या वडिलांनी सांगितलं की, ‘आरोपीची त्या इमारतीत पार्किंग आहे. पण तो दुसरीकडे कुठेतरी राहतो’

वडिलांनी काय सांगितलं?

मृताच्या वडिलांनी सांगितलं की, “अपघातानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता आणि आरोपीला जामीन देणार होते. पण आम्हाला हे कळताच, संपूर्ण कुटुंब पोलिस ठाण्यात गेले आणि त्याला जमीन देण्यापासून रोखले” जयप्रकाश सिंह यांनी आरोप केला की “कार चालकाने केवळ अपघात घडवून आणला नाही तर त्यांच्या 4 वर्षांच्या निष्पाप मुलाला गाडीसोबत ओढून नेले” हिट अँड रनचा आरोप करत त्याने कठोर कारवाईची मागणी केली.

दिंडोशी पोलिसांनी काय कारवाई केली?

दिंडोशी पोलिसांनी सांगितले की “त्यांनी या प्रकरणात एफआयआर नोंदवला आहे आणि इनोव्हा कार चालक रमेश देवजी जतरारा याला अटक केली आहे”