3 महिने मांडवा-मुंबई जलवाहतूक बंद राहणार! 26 मेपासून रस्त्यानं गाठावी लागणार मुंबई

| Updated on: May 18, 2022 | 8:29 AM

पावसाळ्यात बंद राहणाऱ्या या जलवाहतुकीचा परिणाम अलिबाग आणि रायगडमधील पर्यटनावरही होतो

3 महिने मांडवा-मुंबई जलवाहतूक बंद राहणार! 26 मेपासून रस्त्यानं गाठावी लागणार मुंबई
कामाची बातमी
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : वेळ वाचवणारा प्रवास म्हणून मुंबई गेटवे ते मांडवा (Mumbai Gateway of India to Mandava) हा प्रवास फायदेशीर ठरतो. मात्र पावसाळा सुरु होणार असल्यानं या जलमार्गावरची प्रवासी वाहतूक सेवा तीन महिने बंद ठेवण्यात येणार आहे. 26 मे ते 31 ऑगस्टदरम्यान प्रवासी जलवाहतूक बंद ठेवली जाते. त्यामुळे आता मांडवाहून (Alibaug News) मुंबईला येणाऱ्यांना रस्ते मार्गानेच मुंबई गाठावी लागणार आहे. परिणामी लाटांवर हेलकावे खात मांडवा घाठण्यासाठी काही दिवस ब्रेक घ्यावा लागेल. महाराष्ट्र सागरी मंडळ विभागाने प्रवासी जलवाहतूक कंपन्यांना ही वाहतूक बंद (Sea Traveling) ठेवण्याबाबत पत्र दिलं आहे. खबरदारी म्हणून पावसाळ्यात जलवाहतूक बंद ठेवली जाते. त्यानुसार 26 मे पासून 31 ऑगस्टपर्यंत ही वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

अनेकांची जल वाहतुकीला पसंती…

मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया या जलवाहतुकीला अनेकांची प्रसंती पाहायला मिळाली आहे. रायगड किंवा अलिबागमध्ये जाणाऱ्यांना स्वस्त दरात आणि कमी वेळेत मुंबई गाठणं या जलवाहतुकीमुळे शक्य होतं. त्याचप्रमाणे असंख्य पर्य़टकही या जलवाहतुकीचा आनंद घेण्यासाठी येत असतात.

पीएनपी, मालदार, अजंठा, अपोले या कंपन्यांच्या बोटी मांडवा ते गेट वे जलवाहतूक मार्गावर प्रवासी सेवा देतात. पावसाळ्याचे चार महिने ही सेवा बंद केली होते. पुढच्या आठ दिवसांनी ही जलवाहतूक खबरदारीच्या कारणास्तव बंद करण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडीओ : आधी मुलांना विष दिलं, मग मातापित्यांनी आत्महत्या केली?

पर्यटनावर परिणाम

पावसाळ्यात बंद राहणाऱ्या या जलवाहतुकीचा परिणाम अलिबाग आणि रायगडमधील पर्यटनावरही होतो. मुंबईकरांची मांडवा किनाऱ्याला पर्यटनासाठी पसंती असते. मांडवा इथं पर्यटनाच्या दृष्टीनं अनेक गोष्टींचा विकास झाला आहे. वेगवेगळ्या समुद्री खेळांसह निवांत आणि शांत वातावरणासाठी हाकेच्या अंतरावर असलेल्या मांडवाला पर्यटकांची पसंती असते.

आठ ते नऊ महिन्यांत जवळपास दर दिवशी हजार ते दीड हजार प्रवाशी पर्यटनासाठी जलवाहतुकीद्वारे इथं मुंबईहून येत असतात. मात्र जलवाहतूक बंद असल्यानंतर अलिबागसह मांडवा इथल्या पर्यटनावरही परिणाम जाणवतो.