मुंबईच्या राजाच्या विसर्जनाचा मार्ग अखेर मोकळा! पोलिसांची परवानगी; मिरवणूक अन् विसर्जन कधी होणार?

Mumbai Cha Raja Visarjan: ‘मुंबईचा राजा’च्या विसर्जनात मोठं विघ्न आले होते. मात्र आता मुंबई पोलिसांनी विसर्जनाला परवानगी दिली आहे.

मुंबईच्या राजाच्या विसर्जनाचा मार्ग अखेर मोकळा! पोलिसांची परवानगी; मिरवणूक अन् विसर्जन कधी होणार?
| Updated on: Sep 24, 2026 | 9:36 PM

मुंबईच्या प्रसिद्ध ‘मुंबईच्या राजा’च्या विसर्जनाबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. मुंबईच्या राजाचं विसर्जन उद्याच होणार आहे. मुंबईच्या राजाचे मंडळ मूर्तीचे समुद्रात खोलवर विसर्जन करण्याची योजना आखत होते. मात्र मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली होती. परवानगीसाठी मंडळ आणि पोलीस यांच्यात बैठक सुरू होती. यानंतर अखेर मुंबई पोलिसांकडून परवानगी देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या राजाच्या विसर्जनासाठी मंडळाच्या सदस्यांना सागरी विभागाकडून परवानगी मिळाली होती. परंतु मुंबई पोलिसांकडून परवानगी मिळालेली नव्हती. पोलीस मंडळाच्या सदस्यांच्या सतत संपर्कात होते. या संपूर्ण प्रकरणावर चर्चा सुरू होती. यानंतर मुंबईच्या राजाच्या विसर्जनाला अखेर परवानगी मिळाली. नवीन तराफ्यावरून विसर्जन करण्यासाठी मुंबईच्या राजाला परवानगी देण्यात आली आहे.

उद्या रात्री 7 ते 8 पर्यत विसर्जन करण्याची पोलिसांनी परवानगी दिली आहे. यानंतर ओहोटीच्या वेळेस विसर्जन करण्याचा मंडळाने निर्णय घेतला आहे. पोलीस आणि पदाधिकारी यांच्यातील चर्चेनंतर अखेर परवानगी मिळाली आहे. मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक उद्या वेळेतच निघणार आहे. सकाळी ७ वाजता गणेशगल्ली येथून मिरवणूक निघणार आहे. अगोदर तराफ्याची परवानगी दिली असल्याची मंडळाकडून माहिती देण्यात आली आहे.

यावर्षी ‘मुंबईच्या राजा’च्या ९९ व्या सालाच्या निमित्ताने मंडळाने प्रथमच २२ फूट उंच पुतळ्याचे गिरगाव चौपाटीवरून एका अत्याधुनिक बार्जच्या साहाय्याने थेट खोल समुद्रात विसर्जन करण्याची योजना आखली आहे. मात्र मुंबई पोलिसांनी या प्रकल्पाला परवानगी दिलेली नव्हती. मंडळाने महाराष्ट्र सागरी विभागाकडून परवानगी मिळवली असली तरी गिरगाव चौपाटी परिसर महानगरपालिकेच्या अखत्यारीत येत असल्याने विसर्जनासाठी पालिकेच्या परवानगीची आवश्यकता होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us